Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१६३] ।। श्री ।। ८ फेब्रुआरी १७६०.
श्रीमंतराजश्री भाऊसाहेबांचे सेवेसी:
श्री सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यआज्ञाधारक संताजी वाघ दंडवत विज्ञापना येथील कुशल तागाईत माघ वद्य सप्तमी पावेतों साहेबाचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण आजच हिंदुस्थानचे स्वारीस सुमुहूर्ते निघून डेरियास आलों. याउपरि मजलदरमजल तीर्थस्वरूप राजश्री मामाजवळ फौजसुद्धां जाऊन दाखल होतों. आह्मांस सर्वस्वें आश्रा स्वामीचे पायाचा आहे. पूर्वींपासून एकनिष्ठ सेवकव्रत मात्र जाणत आहों. सर्व निर्वाह करणार धनी समर्थ आहेत. वरकड वर्तमान राजश्री हरि वल्लभ यांनीं विज्ञापनापत्र लिहिलें आहे, त्यावरून विदित होईल. कृपाळू होऊन पत्राचें उत्तर आज्ञापत्र पाठवावें. बहुत काय लिहिणें. कृपा कीजे. हे विज्ञापना.
पे॥ छ २१ जमादिलाखर.