Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४४]                                        ।। श्री ।।                          १३ नोव्हेंबर १७५९.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दन पंत स्वामीचे सवेसीः-

पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥मार्गशीर्ष वद्य ९ जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष. येथील वर्तमान कि तेक तुह्यांस दोन तीन पत्रीं लिहिलेंच आहे. आम्हीहि येथून बिदा जाहलों. दरमजल तिकडे येतों. तुम्हीं येकंदर जाण्याचा विचार न करावा. मार्गशीर्ष वद्य १० बुधवारीं आह्मीं निरोप२०५ घेतला. तेथें फौज फार जमा झाली. लाहोराकडून तमाम फौज आली. त्यास, तुह्मीं एकंदर न जाणें. इकडे अबदालीचा दंगा फार झाला. दिल्ली पळाली पातशाहा वजिराचे कबिले आगरेयास गेले. पातशाहा वजीर येथें येतात. आह्मी दरमजलींनीं येतों. याउपरि गुंता नाहीं. वरकड चिरंजीव बाबा तुह्मांस सांगतील. मार्गी दंगा जाला, माणूस निभावत नाहीं. इकडे फार कजीया झाला. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.