Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४७]                                        ।। श्री ।।                      २१ डिसेंबर १७५९.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसी:-

पोष्य गोविंद बल्लाळ सा। नमस्कार विनंति. येथील कुशल ता॥ पौष शुध २ जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. येथील कुशल वर्तमान चिरंजीव बाबास लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. आह्मी शिंदे यांचा निरोप घेतला. यमुनेवर आलों. त्यास पारून२१० दिल्लीवरून रूपराम कटारे तुह्मीं जाणें ह्मणून सांगितलें. बुनगे पार गेले. सडे अलीकडे आज राहिलों. पार जाऊन दिल्लीकडून त्यामागें मथुरेजवळ उतरावयास येतों. र॥ भास्करपंतदादा खंदापार आहेत. चिटणिसीचें काम दादोपंत यांचें होतें. देतों. पार उदयिक जातों. त्यांचेंच पत्र तुह्मांस येईल कीं चिटणिसी आह्मी लिहूं लागलों, ह्मणून लिहतील. त्याजवरून कळेल. आह्मी पार उतरलों. काय निमित्य तरी? अबदालीची फौज सरदेआलीकडे वीस कोस, कुरुक्षेत्राहून पंधरा कोसांवर; तो आला. त्यास सडी फौज र॥ दत्ताजी शिंदे घेऊन पुढें गेले. त्याचें व ह्यांचे अंतर दाहा कोसांचें राहिलें. याजकरितां आम्हांस सांगून पाठविलें कीं आह्मीं सडे गेलो. आह्मीं अबदाली रेटिला तर फार उत्तम जालें र॥ जनकोजी शिंदे, गाजुद्दीखान वजीर व आह्मी राहिलों. त्यास, बुनगे घेऊन र॥ जनकोजी शिंदे, गाजुद्दीखान घेऊन पाटीलबावाकडे जातील. आह्मी दरमजलींनीं येऊन. जर करितां अबदाली न रेटे तर बुनगे घेऊन आह्मी व रूपराम कटारे जाटाची फौज असे दिल्लीवरून दरमजलींनीं बुनगे घेऊन येऊन. चमेल पार करून देऊन. आह्मी इटावेयाजवळ पार येऊन. याजकरितां दोन रोज राहिलों. अबदाली व पाटीलबाबा सात कोस अंतर. आज लढाई२११ अगर प्रातःकाळीं होईल. ईश्वर ज्यास२१२ यश देईल त्यास सुखें देऊं ! तुह्मांस चिरंजीव बाबांनीं राहविलें. त्यास, गडबडीचा समय. याजकरितां चार रोज लागले. तर संशय न धरणें. श्रीमंत स्वामीचे प्रतापें बहुत भाग्यें अबदाली माघारा जाण्यांत उत्तम आहे. ईश्वर उत्तमच करील. रुमाल, कारकून आणविले. गडबड जाली. खळबळ जाली. याजकरितां आह्मांस येथें राहणें नाहीं. बुनगे घेऊन येऊन. तर मी व एकटे आपले फौजेनिशी येऊं तर या पत्रामागें मागें येऊन पावतों. चार रोज लागले ह्मणून उदास न होणें. कार्तिक वद्य२१३ ५ श्रीमंत स्वामींनीं अमदानगरचा किल्ला घेतला. अमलदारास ताकीद पाठवून हिशेब जलदीनें आणवणें. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे हे विनंति. अबदालीची गडबड फार आहे. हे विनंति.