Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४२]                                        ।। श्री ।।                          ८ नोव्हेंबर १७५९.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामींचे सेवेसी:- 

पोष्य गोविंद बल्लाळ साष्टांगनमस्कार विनंति. उपरि येथील कुशल ता।। मार्गशीर्ष वद्य ४ मु॥ सुकरतला जाणून स्वकीय कुशल करीत असिलें पाहिजे. विशेष. आह्मी श्री गंगा उतरून पार गेलों. आठ दाहा रोज पार तमाम जागा लुटिली, जाळिली. त्यास, रोहिलेहि आपली जागा बतंग जाले. त्यास, राजश्री साबाजी पाटील शिंदे यासीं व अबदालीसी लढाई२०१ जाली. त्याजवर अबदाली भारी फौजेनिसीं आला. त्याजवर हे दरमजलींनीं येथें लष्करीं दाखल२०२ जाले. अबदालीचे कजीये यामुळें दिल्ली तमाम पळाली. उजाड जाली. पातशा, वजीर हे येथें या लष्करीं दाखल होणार. त्यास, याप्रकारे वर्तमान जालें. काहीं पत्रें पुणेयाहून चिरंजीव बाबूराव यांचीं आलीं. त्यांत जो भावार्थ होता तो साद्यंत र।। दादोपंत, भास्करपंत यांस साद्यंत सांगितला. तेहि तुह्मांस तपसीलवार लिहितील. त्याजवरून कळों येईल. दरबाराची, खावंदांची मर्जी एक प्रकारची जाली. आह्मी येथें येऊन गुंतलों. त्याजकरितां तुह्मीहि येथें आलां. तुह्मांस एक जमीदार अगर पाटील तोहि भेटला नाहीं. तुह्मीं तरी काय करावें? खावंदाजवळ गेला. त्यांणीं पुसिलें कीं तुह्मीं कोण प्रकारें तरतूद केली. त्यासमयीं तुह्मांस केली असेंहि ह्मणतां नये; न केली असेंहि ह्मणतां नये. दोहींकडून तुह्मी काईल व्हाल. तेव्हां आह्मांवर शब्द. येणेंप्रमाणें जालियास आमची नुकसानी. कां कीं? दोन सालें झाली. तुह्मी एका गांवांत माहीत नाहीं. तुह्मांस तरी काय शब्द ? त्यास, आह्मी येथें गुंतलों नसतों तर या चार महिन्यांत तुह्मी सर्व कामकाजात माहीत होता. आणि सर्व तुमचे नजरेंत येतें. तेंहि न जालें. त्यास, समय ह्यणावे तरी हिंदुस्थान गडबडलें आहे. त्यास, जर तुह्मांस आमचे बरें करणें तर आपण राहावें. मीहि आठ पंधरा रोजांत हरप्रकारें निकाल करून तुह्मांजवळ येतों. ज्याप्रमाणें श्रीमंत स्वामींची मरजी त्याप्रमाणें मजला करणें आणि तुमची खुषी तेंच मजला करणे. सारांश, तुमचे गेलियानें आमचा नाश होतो. श्रीमंत स्वामींचे दरबारचे दरबारचा मजकूर तुह्मांस सर्व कळलाच आहे. त्यास, आह्मी मोठे समुद्रांत पडलों आहों. त्यास, यासमयीं तुह्मीं उतावळी करावीसी नाहीं. बरें ! तुह्मी समयानुरूप आह्मांजवळ आला तर तुमचे आलियानें उभयपक्षी उत्तम व्हावें. त्यास, तुह्मांस आह्मीं शब्द लावावा तर तुह्मांवर शब्द काय? आह्मी येथें गुंतलों याजकरितां इतके दिवस जाले. तुमचेहि प्रत्ययास येतें. चार जमीदार येते, कामकाज चालीस लागतें. त्यास, मी येथें गुंतलों त्यामुळें तेहि न आले. त्यास, जर तुह्मांस आमचें बरें करणें तर तुह्मीं देशास प्रस्तुत न जाणें. मजला येऊं देणें. तुमचे चित्तानुरूप परगण्याचें मागील तीन साला व पुढील जैसें पाहिजे तैसें तुमचें ठीक करून देऊन. मी येथें गुंतलों नसतों तर सर्व जमीदार तुह्मांस भेटते. कामकाज ठीक सुतीं लागतें. तें न जालें. येथें दिरंग जाला. याजकरितां तुह्मांसहि वाईट लागलें. त्यास, यासमयीं तुह्मीं चित्तांत दुसरा अर्थ एकवार न आणितां तुह्मीं राहावे. खजिना पुढें जाऊं द्यावा. यांत कांहीं दुसरा अर्थ चित्तांत न आणावा. जर तुह्मी जावयाचें कराल तर एकंदर न करणें. समय आहे. सर्वकाळ सारखा असत नाहीं. एकच वेळ समय पडतो. मी त्या प्रांतीं असतों तर इतकें कशास होतें ? मजला इकडे यावयास आणि कामकाजास दिरंग व्हावयास गांठ पडली. त्यास, तुह्मी याजउपरि खायीनखायी२०३ जावयाचें न करावें. तुमचे गेलियानें आमचें काम नासतें. दूरंदेशीं पाहणें. दूरंदेश ! रांगडा ! परमुलूख! जिवावरील खेळ ! याजप्रमाणें आहे. आह्मी च्यार रुपयास गुंतलों. काल, देश, वर्तमान, लोकांचें देणें याजमुळें रात्रंदिवस जिवास घोर ! तुमचे मनीं संशय आला. दोन वर्षे जालीं. कांहीच परगण्याचें आवसान न सांपडे. हेंहि खरेंच! त्यास, याजमागें इकडील गुंतेयामुळें जालें तें चित्तांत न आणणें. याजउपरि माझे यावयाचा मात्र गुंता आहे. त्यास, मी सत्वर येथें हरकोणास ठेवून येतों. विलंब करीत नाहीं. तुह्मी चित्तांत संशय दुसरा अर्थ न आणतां राहणें. वरकड वर्तमान वरचेवर लिहीत जाऊन. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.