Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४३]                                        ।। श्री ।।                          ११ नोव्हेंबर १७५९.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व र॥ जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः

पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ मार्गशीर्ष वद्य ७ मु।। सुकरतला जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. परवाचे रोजीं पत्र तुह्मांस मुजरद जोडी चिरंजीव बाबा जवळ पाठविली. परंतु मार्गी गडबड जाली. याजकरितां पावेल न पावेल ह्मणून हल्लीं मुजरद जोडी पाठविली आहे. त्यास, आपण देशास जावयाचें तूर्त न करावें. श्रीमंत स्वामीची मरजी दरबारची एक प्रकारें जाली. आह्मी येथें गुंतलों. दिवसगत लागली. त्याजमुळें तिकडील रुजवात वगैरे कामकाजें आटकोन राहिलीं. त्यास जो विचार आहे, दरबारचा, तो सर्व आह्मीं पेशजी पत्रे पाठविलीं त्यांत लिहिला आहे. श्रीमंत स्वामीची बहुतच मरजी बारीक जाली आहे. येथें गुंतलों त्याजकरितां दिवसगत लागली. तुह्मांस परगणेयांतील जमीदार व कांहींच रुजू न झालें. तुह्मांस तरी आह्मीं काय शद्ब लावावा ? त्यास, तुह्मीं दोन मास देशास जावयाचें एकंदर न करावें. तुह्मी गेलियावर आह्मांवर पेंच हक्कनाहक्क येतो. श्रीमंत हेंच ह्यणतील, बाहाना करून राहिले. तर जर आह्मी बाहाना करून राहों तर आह्मांस नफा काय? खावंदाची मरजी प्र।। कार्य जाहलियानें खावंद राजी; आपला फडशा. त्यास, येथें दिवसगत लागली तरी तुह्मांस दखलगिरी न जाली. हेंहि खरें. त्यास, आह्मीं तुह्मांस हजार प्रकारें लिहिलें तरी येथें गुंतलों खरें ? त्याजमुळें सर्व कामें नाशिलीं. दरबार सर्व सोडून येथें गुतलों. घरचें कांहीं असो. परंतु दरबारचा फडशा जाला ह्मणजे सर्व मेळविलें. त्यास, दोन मास देशास जावयाचें एकंदर न करणे. तुमची आमची भेट जालियावर सर्व दरबारचें वर्तमान सांगूं. वरकड र॥ भास्करपंत व दादोपंत यांस तपशीलवार सांगितलें आहे. दरबारीं कोणाची मुरवत अब्रू तीळमात्र राहिली नाहीं. मीहि तिकडें असतों तर या चारसा महिन्यांत सर्व कामे फडशा होती. परंतु आमचे राशीस कोण ग्रह आला त्याणें येथें आणून फसविलें! बरे! आतां तो कांहीं म्हणतां नये. हेंहि कार्य सरकारचे मागें ठीक झालें असतें. चिरंजीव बाबाची तुमची गांठ पडली असती म्हणजे आह्मी सुचिंत होतो. तेहि सत्वर माघारे जाऊं ह्मणून तेहि राहिले. त्यास, याजउपरि तुह्मीं देशास जावयाचें न करणें. काळी२०४ र॥ साबाजी पाटील येथें फौज सुद्धां आले. सुरजमल्ल जाट याजकडीलही फौज काळीं पाच हजार आली. र॥ मल्हारराऊ सुभेदार हेहि जयनगराकडे आले. त्यांजकडेहि सांडणी व कासीद गेले. तेहि सत्वरच येतील. येथेंहि फौज मातबर जमा जाली. सुजातदौले व रोहिले एक जाले. परंतु गंगापार होऊन त्याजला येवत नाही. असो. आह्मी चारसा रोजांनी पातशा वजीर दिल्लीहून शाहाडोलेयांत काळीं डेरे देऊन राहिलो. दरमजलींनीं तेहि पाचवे सावे रोजीं येथें दाखल होतात. पातशा वजीर यांचे कबिले जाटाचे मुलकाकडे अगरेयास गेले. अबदाली लाहोरास दाखल जहानखान ह्मणून जाला. इकडें यावें हा इरादा आहे. त्याजमुळें या प्रांतीं गडबड फार जाली. दिल्ली वोस जाली. वरकड वर्तमान तर अधिकोत्तर काय लिहावें ? या समयीं तुह्मीं जावयाचें न करणें. आह्मांवर हकनाहक पेंच येतो. आह्मी सर्वस्वें गुंतलों. कर्जें लोकांचीं देणें. येथें येऊन चार पेचांत पडलों. त्यास, पातशा वजीर येथें दाखल होतांच आह्मी निरोप घेऊन तिकडे येतों. फरुकाबादवाला व आह्मी एकत्र होऊन सर्व रोहिले व सुजातदौले एकत्र जाले. तिकडे कोणी नाहीं. त्याजला पायबंद फरुकाबादेस पुल बांधोन पार गडबड करून जागा जाळावी, लुटावी. त्यास, चिरंजीव बाबास फौजेंत देऊन तुह्मी आह्मी आपले कामास लागों. याप्रमाणें येथें ठहराव जाला. पातशा वजीर दरमजलीनीं येत आहेत. ते येतांच आह्मी येथून निघोन येतों. याप्रमाणें कालीं रात्री पाटिलबावाशीं खलबत जालें. तुह्मांस कळावें. तुह्मीं एकंदर जाण्याचें न करणें. समय घडीघडी येत नाही. आह्मांस इकडे गुंतावयास, सरकार कार्यास विलंब व्हावयास गांठ पडली. त्यास, तुह्मी शहाणे आहां. सर्व तुह्मांस कळतें. आह्मांस पेंचेंतून काढणे. मीहि कोणावर पेंच येऊं देणार नाहीं. दोन मास सबुरी करणें. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.
मिती मार्गेश्वर शुद्ध २ सन
सितैन मु।। इटावे.