Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४६]                                        ।। श्री ।।                        २४ नोव्हेंबर १७५९.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः 

पोष्य गोविंद बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल तागाईत मार्गसीर शुध ५ जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. सविस्तर चिरंजीव बाबांनीं लिहिलें त्याजवरून कळलें. त्यास, तुह्मी राहिला येणेंकरून आह्मांस फार संतोष जाला. तुह्मी येथें लष्करीं फार श्रमी जाला. तुह्मांस तरी आह्मीं काय शब्द लावावा? तुह्मांस कांहींच परगणे यांत दाखलगिरी न जाली. इकडे येऊन बहुत दिवस गुंतलो त्याजकरितां तुह्मांसहि संशय जाला. त्यास, सविस्तर चिरंजीव बाबा तुह्मांजवळ बोलिले त्याचप्रमाणें आह्मी करून. त्यांत काडीइतकें अंतराय होणार नाही. आह्मी येथून निरोप मार्गशीष वद्य२०७ १३ घेतला. दोन चार रोज किरकोळी गुंत्याकरितां राहिलों. प्रस्तान राजश्री रामाजीपंतभाऊ यांचे घरीं ठेविलें. त्या सकाळीं सुजातदौला याची आवई जाली कीं फौजसुद्धा अलीकडे झुंजावयास येतो ज्याजकरितां राहिलों. आज त्याजकडील वकील त्रिंबकदास आला. त्यांस, उदईक हफीज रहिमत येणार. त्यास सलूख किंवा बिघाड दोहींतील एक पाहून जाणें ह्मणून पाटीलबाबांनीं सांगून पाठविलें. आमचे बुनगे तीन कोस मागे गेले. सडे येथें आहों. उद्याच्या रोजांत सर्व कळेल. दर मजलीनें इटावेयांस येतों. तुह्मीं एकंदर जावयाचें न करणें. तुमचे मर्जीप्रमाणें, श्रीमंत स्वामीचे आज्ञेप्रमाणें, चिरंजीव बाबा तुह्मांसी बोलिले, त्याचप्रमाणें करून. दुसरा अर्थ चित्तांत एकंदर आणणें. अबदाली लाहोरास आला. शीखांसी२०८ मोठी लढाई जाली. दोन हजार आबदालीची फौज मारली गेली. जाहानखान जखमी जाला. ते लाहोराकडेच आहेत. मागें फौज तीन हजार व पाईचे माणूस तीन हजार होते, मुलतानाकडे. त्यास, लाहोराअलीकडे सुखरूप आले. दुवाबेयांत गवार मिळोन गळाठा केला. शतद्रूनदी उतरता पलीकडे कांहीं राहिले, कांहीं अलीकडे आले. तेथें दगा जाला. चार हजार उंट, चाळीस रुपयास बोगदी२०९ उंट मिळाला. मोहर रुपये लुटिले गेले. काळीं उघडी माणसें पायी उतारा पांचशें आलीं. हजार घोडे लहान थोर आले. वरकड मारले गेले. मोठी बदनक्षी झाली. दिल्ली पळाली. तमाम मुलूख इकडील पळाली. असो. अबदालीचा शह भारी येऊन पडला, इकडे रोहिले, सुजातदौले एक जाले. दोन शह पडले.