Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

फौज नेमणूकप्रमाणें ठेवावी ते मन मानेल तसी ठेऊन चार रुपये खर्च करावा ऐसें चित्तांत जाणून खर्च बहुत करितात. कलम १

वांटणी केली त्यास शिंद्याकडे एक परगणा पांचा लाखाचा गुजाराविशीं होता तो दिल्हा व जे सिबंदी बहुत नलगे ते परगणे त्याजकडे दिल्हे. बहुत सिबंदी लागती ते परगणे सरकारांत ठेविले. कलम १

उभयता चिरंजिव भेटी व नजराणे आंतस्ते घेतात. कलम १

आह्मी कर्ज जमा धरून सीलेदार यास मात्र रोजमारा देतों; महालाचा अगर आणीक कोठील दाखला आजपर्यंत किमपि नाहीं. कलम १

आह्मांकडे माणूस आलें त्यास बरें पहात नाहीं; मग जमीदार आला तरी तो जीवें कैसा राहील ? या दहशतीमुळें कोणी येऊन आह्मांस भेटत नाहीं. कलम १

येथील अर्थ दुसरा वकील आल्याखेरीज कांहीं समजत नाहीं. कलमरुजवात यथास्थित होणार नाहीं. कलम १

येथील जुने कारभारी आहेत ते मन मानेल तैसें कारभारांत पडोन जें मिळविणें ते मिळवितात. कलम १

सदर्हुप्रमाणें राजश्री बाबूरायास भाऊसाहेबीं बोलावून नेऊन येणेंप्रमाणे कागद फडणिसांचे आले आहेत. तरी तुह्मीं सावध असणें. त्याजवरून हें वर्तमान दहा बंद अगदीं तपशीलवार लिहून आजुरदार पाठविला तो छत्तीसावे रोजीं येथें आला. याप्रमाणें बजिन्नस बाबूरायाचें पत्र आलें तेंच बजिन्नस वाचून मला दाखविलें आणि ऐशा गोष्टी सांगितल्या. हे विनंति.