Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४१]                                        ।। श्री ।।                          ७ नोव्हेंबर १७५९.

विनंति. वेदमूर्ति राजश्री बापुभट झांशीस होते. त्यांचें पत्र आले होते कीं, आह्मी छ २९ सफरीं निघोन मजलदरमजल श्रीस गेलों. तुह्मीं पितांबर आणविला आहे. त्यास, तेथे गेल्यानंतर पितांबर मुजरद माणसाबरोबर पाठवून देतों असें लिहिलें होतें. त्यास, वेदमूर्ति क्षेपनिक्षेप गेले. तुह्मांस पितांबर खामाखाय पाठवून देतील चिंता नाही. आपण पितांबराची दुसरी तर्तूद न करावी. क्षेपनिक्षेप लवकरच होईल. कळलें पाहिजे. येथील मजकूर तरी आज छ १६ रौवलीं ऐसी आवई पडली कीं नजीबखान बाहेर निघाला; अवघ्या फौजा तोंडावर असतां बुनग्यांत गलबल होऊन तिही१९७ लष्करचे बुनगे आंग बिलगून चार कोस गेले, शिंदे स्वारीहून आल्यानंतर मागती याच मुक्कामीं राहुट्या झाल्या; ऐशी लटकीच आवई पडली. त्याप्रमाणें बंदोबस्तीचा१९८ मजकूर ऐसा आहे. गंगेपार फौजा गेल्या होत्या, त्या सुजातदौला आला असें वर्तमान ऐकून फौजेनें आवई खाऊन गंगेअलीकडे अवघी फौज आली, कित्येक गंगेमध्यें वाहवले, कित्येक मारले१९९ गेले. त्यांणीं चडीस परीधाराजवळ पलीकडील आंगें ठाणें बसविलें. त्या फौजेची दहशत भारी पडली आहे. गोसावी सुजातदौल्याकडील पांचहजार फौजेनिशीं तो पुलावरून नजीबखानाचे लष्करांत आला. याउपरि बुनगे मागें आठा कोसांवर ठेवून, सड्या फौजा करून, या तळावर असावें याप्रमाणें करणार आहेत. लाहोराकडे अबदाली आला. त्याची व साबाजी पाटील याची लढाई झाली. त्याची फौज भारी ऐसें देखोन साबाजी पाटील मजलदरमजल येथून आठाकोसांवर आले आहेत. उदईक साबाजी पाटील लष्करांत येणार. अबदाली सिदरेवर आहे. अद्यापि आला नाहीं. परंतु येणार ही गडबड आहे. दिल्ली अगदीं पळोन गेली.
$ वजीर व पातशाहा मल्हारजी होळकर याजकडे जाणार ऐसें आहे. आपण राजश्री पंतानी मजकूर लिहिला त्याजवरून कळो येईल. राजश्री बाबूराव याजकडून पत्रें आलीं. त्यांत मजकूर की फडनिसांनीं आपले घरास राजश्री नारोपंतास वर्तमान लिहिले. त्यांनीं श्रीमंतांस तींच पत्रें नेऊन भाऊसाहेबांस दाखविली. त्यास, त्यांजपाशी बातमीच होती. तें वर्तमान थोरल्यास कळतांच तेच निघोन भाऊंकडे आले. मग पत्रें पाहिलीं. त्यांत मजकूर लिहिला होता त्याचीं कलमें.२०० मागील जमा आहे. त्यापैकीं सोडून देऊन जमा कमी करतात. कलम १
दोन रुपये मागें ज्या महलांत सिबंदी प्यादे होते त्याचा खर्च होता तो जास्ती वाढविला. ज्या ठिकाणीं पांच प्यादे राहिले होते तेथें हल्लीं पंचवीस ठेवितात कलम १