Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४०]                                        ।। श्री ।।                          ४ नोव्हेंबर १७५९.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामींचे सेवेसीः- 

पोष्य गोविंद बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय तागाईत कार्तिक शुद्ध१९४ १५ पावेतों लिहिलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें हरिद्वाराचे मुक्कामीं पावलें. सविस्तर कळों आलें. तिकडील वर्तमान लिहावें ह्मणून लिहिलें. त्यास, आह्मी श्री गंगापार उतरून जलालाबादेपावेतों गेलों. तेथें जाबताखान नजीबखानाचा लेक होता. त्यास सादुलाखान, दुंदेखान व हापसरहीम रोहिले तमाम सामील जाहले. रोज लढाई होई. रोहिलेच शिकस्त खाऊन जात. ये।। दाहाबारा रोज होतों. पेंढारी याणीं तमाम मुलूख लुटिला, शहरें लुटिलीं, जाळलीं. कोठें मुलखांत दाणा, गुरूं अगर वस्तुभाव राहिली नाहीं. त्याजवर नवाब सुजातदौले रोहिल्याचे कुमकेस आले. त्याजवरून फौजा फिरोन माघा-या आल्या. त्याचेहि वकील जाबसाल आले आहेत. सुजातदौल्याशीं ठीक करून मग फौजा फिरोनहि पार जातील. तुह्मी पुढें इटावी, कोच, झांशी जागजागा पावाल. तेथून सुखरूप पावलियाची व नवल विशेष वर्तमान असलेलें तें लिहीत जाणें. अंबदाली१९५ कुरुक्षेत्रास येऊन पोंचला. यास्तव चोंहीकडे दंगा दिसतो. देशींहि दंगा ह्मणून ऐकतों. याजकरितां तुह्मीं जावयाचा विचार एकवार न करावा. खजिना सरकारचा झांशीस लावून द्यावा. तेथे किल्ला आहे. जाऊन राहील. तुह्मीं एकंदर जायाचा विचार न करावा. साबाजी१९६ शिदे येऊन फौजेंत सामील झाले. अबदाली सतलज नदीवर आहे. खासा लाहोरास आहे. जहानखान सतलज नदीवर आहे. तुह्मीं पुढें एकंदर न जाणे. मागाहून मुजरत जोडी तुह्यांकडे पाठवितों. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.