Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१३८] ।। श्री ।। आक्टोबर १७५९.
.पु॥ राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः-
विनंति उपरि. इकडील वर्तमान तर श्रीगंगापार झालों. परंतु परम कष्टें झालो! त्यास, जीवावरील जोखीमधारा मोठी कठीण! त्यास पार येऊन जलालाबादेजवळ रोहिले, नजीबखानाचा१८९ लेक, दुंदेखान१९०, सादुल्लाखान१९१, हफीज१९२रहिमत, दाहा हजार फौज, दाहा हजार प्यादे जमा झाले आहेत. बाण, जेजाला, तोफा समागमें आहे. लढाई एक दोन जाली. तोफा, बाण, तोफा हिरोन घेतली. रोहिले याजकडील चाळीस पन्नास घेतली. घेरून आह्मी आहों. रोहिले याचे लष्करी पीठ चार शेर जालें. घुगरी खातात. नजीबखानाच्या पुलापावेतों गांव जाळिले. पुलाजवळ पन्नास घोडे घेतले. पुलाच्या दोन नावा तोडून टाकिल्या. नजीब चार रोजांत तेथून निघेल. त्यास, आह्मी या घोरांत पडलों. त्यास, पंधरा रोजांत येथील मुकदमा फडशा होईल. हाफिजाकडून रात्रौ पत्रें आलीं. नरम जाले. सलूक करतील. तुह्मी प्रसंगी जाता. येथील सर्व तुह्यांस सांगितलें आहे. कोणी गोष्ट आह्मांकडील संशयाची चित्तांत न आणणें. ज्यामध्यें आमचें बरें तें जरूर जरूर तुह्मी कराल. दरबारी नानाप्रकारें नालिशी चुगली करितात. त्यास, बहुता ब्राह्मणांचे अन्न आहे. मजला साफ पैसेयास तफावत करणें नाही. येथून येतांच परगणेयांत जाईन. गांवचा पाहून पैसानपैसा ठिकाणीं लावीन. सं० १८१३, सं० १८१४ दुसाला हिशेब जाले. रुजुवात करून जे कसर रयत व मामलेदार यांजकडे निघेल ते सरकारी जमेस येईल. सं० १८१५, सन तिसा हिशेब व रुजुवात होणें तेहि होईल. दरबारचा रंग पाहिला. खावंद चौकशी करूं लागला. आतां पैसेयाचा लोभ धरून मेळविली अबरू ते कां गमवावी ? त्यास, आह्मी सर्व आपले ध्यानांत आणून सर्व तुह्मांस सांगितलें आहे. कांहीं सांगावयास विसरलों असलों तर सर्व तुह्मीं स्मरण धरून सर्व उत्तमच करणें. आह्मी भवसमुद्रीं पडलों आहों. पार करणार ईश्वर आहे. मागाहून साद्यंत तुह्मांस व चिरंजीव बाबूराऊ यास लिहून पाठवितों. यासमयीं आह्मी येथें गुंतलों आहों. सर्व भरंसा आह्मांस तुमचा आहे. वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. श्रीरंगपट्टण१९३ गार्दियानी घेतलें. मोठें संस्थान विछिन्न जालें! निजामअल्ली तूर्त बिघाड करीत नाही. सलूखच आहे. मी सुचित झालों ह्यणजे तपशीलवार तुह्यांस लिहून पाठवून देतों. तुह्मीं मार्गी सावधपणें जाणें. वरचेवर आह्मांस वर्तमान लिहीत जाणें. आह्मी येथें येऊन गुंतलों. लढाईचा कारभार. सरकारी कार्य. कसें जावें ? हें कार्य जालियावर परगणेयांत येतों. दरबारचें काम कळेल त्या प्रकारें साधावें. बहुत काय लिहिणे. कृपालोभ असो दीजे. हे विनंति.