Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१३७]                                        ।। श्री ।।                          २१ आक्टोबर १७५९.

.दस्तक सरकार राजश्री जनकोजी शिंदे ताहां कमाविसदारांनीं व जकातदारांनीं व बाजे राहादारांनीं व जमीनदारांनीं व चौकीदारांनीं महालानिहाय. सु।। सितैन मय्या व अल्लफ. राजश्री त्रिंबक कृष्ण१८५ व राजश्री१८६ जनार्दन अप्पाजी फडनवीस दिंमत राजश्री गोविंद बल्लाळ हे दक्षिणप्रांते जात आहेत. त्यांजबरोबरी उटें व स्वार व पडतळें व प्यादे भारबरदारी व तटें, बैलें आहेत व माणसें व बटकी असेत. तरी त्यांसी राहादारियानें कोणे बाबें मुजाहिम न होणें. एके घडीचा खोळंबा कोणाहिविसीं न होतां सुरक्षित जाऊं देणें. नदी, नाला, नावांवरी पार करून देत जाणें. मुक्कामाचे जागा गांवगन्नाचीं माणसें जागले रात्रौ आपलाले हद्देपार बदरका माणसें व स्वार देत जाऊन १८७पुण्यापावेतों सुखरूप पोहोंचावीत. जाणें. ताकीद१८८ असे. जाणिजे. छ २९ माहे सफर.