Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
कांहीं कागदहि घेऊन गेले होते. एकांतीं याचें व त्याचें बोलणें जालें. ते उठोनि गेलियावर शामजीपंत टकले मये लक्ष्मणपंत गेले होते. यास भेटी पाने देऊन रुकसत केलें. हें वर्तमान आजी सेवकास कळलें. सेवक बाबासमागमें रात्रीं याचे यथें गेलों होतों. तेव्हां न कळे. महाराजाचेंहि पत्र त्यास तेच वेळेस आलें तें बाबासाहेबांदेखतां महीपतराऊजीनें वाचून दाखविलें. शामजीपंतांने दरहिकायत हेहि बोलले कीं निजामदवला जातीनसी साफ आहे. परंतु येकदोघेजण बुद्धीचे भ्रवशक आहेत ते उगेच शिगुसे करावयाच्या विचारांत आहेत; पंरतु शेवट होणार नाहीं. आह्मी तों उत्तर देऊन चुकलों कीं श्रीमंतास बिघाड करून यश नेणार नाहींत. तुमचे वडिलीं व नासरजंगाहीं इतकें केलें. शेवटीं देऊनच सलुख केला. ऐसे आह्मी बोललों. ऐसे दरहिकायत शामजीपंताहीं मजपाशीं सांगितले. कळावें. ह्मणोन लिहिलें असे. आजी छ १२ दीड प्रहर दिवस चढलिया बंदगान अल्ली हिरवे हवदियावर स्वार होऊन दोन अंबारिया जनानियाच्या व येक हत्ती निशाणाचा व स्वार शंभर वगैरे घेऊन निजामदवलाच्या डेरियास गेले. चार घटिका तेथें होते. वाजीदअल्लीखानाच्या भेटीच्या उद्देशें गेलों होतों तों नवाब सलाबतजंग त्याचे धणियाचे येथें गेले. त्याजकरितां भेटीचा योग न पडला. महमदगऊसखान हकिमजीचा आप्त. त्याणें सांगितलें कीं मीं त्याचे कानावर घातलें आहे. त्याचा समय मोठे पाहाटेचा आहे. त्यास पाहाटेच येणें. त्यास प्रातःकाळींच जाऊं. भेटीनंतर सेवेसी लिहितों. सर्व वर्तमान बाबासाहेबास सांगोन सेवेसी लिहितों. याजपैकीं उत्तम जाणावें. तें हकिमजीस इतकी इतला द्यावी. मजला त्यासी गरज नाहीं. महाराजाचा आज्ञांकित आहें. त्यांहीं महाराजादेखतां सांगितलें कीं मजलाहि इतला होय. याजकरितां विज्ञापना केली असे. सारांश स्वामींहीं यश थोर संपादिलें ह्मणून कितेकांस असह्य जालें आहे. परंतु ईश्वरसत्तेनें तेच पराभवातें पावतील. चिंता नाहीं. महाराज स्वामिकार्यावर एकनिष्ठ आहेत. हें नियत पूर्ण यशच आहे. पत्र लिहिलियावर खोजे रहिमतुलाखान बहादूर यांचे येथें गेलों होतों; पुसूं लागले की काय वर्तमान. उत्तर दिलें कीं खैरियत आहे. राजाजीची आज्ञा कीं प्रतिदिनी दर्शन घ्यावें. जो ईरश्याप होईल तो अवधूतरावजीस इतला देऊं. राजाजीस ल्याहावें. त्यांहीं उत्तर दिलें कीं राजाजीस लिहिणें कीं कोणे गोष्टीने वसवसा न कीजे. चर्चा ज्या ऐकत असाल त्याचा इतबार न कीजे. नवाब बसालतजंग डेरियांतून आपले हवेलींत आले आहेत. मागती जातील. फतहुदीअल्लीखानजीची भेटी, जाली. त्याहीं पत्र हकीममहमदअल्लीखानजीस पारसी लिहिलें आहे. तें पाठविलें आहे. त्यास पावतें करावें. जबानीं मजला फतहुदीअल्लीखानजी ह्मणों लागले की हकिमजीचें येक काम तो जालें. दुसरे परगणियाचे पुसिलें त्यास उत्तर खुलासियाचें खोजे रहिमतुलाखान बहादूर यांही दिधलें नाहीं. मागती पुसोन लेहूं ऐसें हकिमजीस सांगावें. जर आज्ञा होईल तर त्याचे कार्याचें पत्र पारसी त्यास वेगळें लिहीत जाऊं. महाराजाचे हस्तें पावतें होईल. याविशीं जैशी आज्ञा. अर्जी भगवंतराव यादव.