Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ १०८ ] ।। श्री ।। ४ आक्टोबर १७५७.
पे॥ छ १९ मोहरम मंगळवार दोन प्रहर दिवस.
सेवेसी महिपतराव लक्ष्मण स॥नमस्कार विज्ञापना ऐसीजे. येथील वर्तमान त॥ छ १८ मोहरम सोमवार चार घटका रात्र पावेतों प्रताप स्वामीचा यथास्थित जाणोन स्वानंदलेखनास आज्ञा केली पाहिजे. विशेष. दरबारचें वर्तमान आज हैदरयारखान सेरजंग यांस पंचहजारी मनसब व झालरदार पालखी जाली. तसलिमात केली. पालखींत बसोन आपले हवेलींत शहरामध्यें दोन घटका दिवस राहतां आले. दरगाकुलीखान कालपासून आपले हवेलींत आले. आज दरबारास लष्करांत गेले नाहीं. उवईक जाणार आहेत. सैदकबीरखान पातशाही बक्षी यासी झालरदार पालखीची तसलिमात जाली. सरमस्तखानाचे पुत्रास व सुलतानखान जमातदार यास मातमीचें खलअत जालें. खोजे रहमतुलाखान पुसत होते कीं हकीम महमदअल्लीखान व तीर्थरूप राजश्री जीवनराव भेटले. इतकें वर्तमान मात्र कळलें. त्याजवर कांहीं वर्तमान गोष्ट मात जाली हें कांहीं लिहिले आलें आहे कीं काय ? उत्तर केलें जें वर्तमान आलें तें निवेदन केलें. पुढें येईल तें निवेदन करून. नवाब निजामुदवला तिसरे प्रहरा स्वार होऊन पैठणदवाजानें शहरांतून नवाब सलाबतजंग याचे मातुश्रीपाशीं गेले होते. तेथून शहामहमुदुचे भेटीस गेले. परस्परें भाषण जाहलें. मग आपले डे-यास आले. वाजीदअल्लीखानाचा व विठ्ठल सुंदर याचा मनोदय कीं जो करारमदार बोली जाली आहे त्यांत निजामुदौलास मेळवून यश द्यावें. निजामुदौलाचे मनांत तो काहीं नाहीं. जे बसालतजंगानें केलें तें मान्य आहे. परंतु संगतीचे लेक खेळ करीत आहेत. इम्राईमखान गाडद्यास लाख रुपये दरमहा करून नोकर ठेविलें. त्यास येथें आल्यावर बंधूचे विचारें मनसुभा आहे कीं बारा लाख रुपये नगद कैसे अनकूल पडतील. याजपेक्षां जागीर द्यावी. राहील तरी ठेवावा. नाहीं तरी आज्ञा द्यावी. नांदेड तिही लाखांचे व माहूर तिही लाखांचे एकूण सा लाखांचे द्यावे. ऐशी चर्चा आहे. कबूल न करील तरी रुखसत करावे. पुढें निजामुदौलास बोलविलें ह्मणोन शिबंदी ठेऊन आलों. त्यास खर्च जाहाला त्यास जागा नाहीं. याजकरितां बालाघाटचे माहाल जागीर करून घ्यावी ऐसा मनोदय आहे. पुढें काय होईल तें पाहावें. नवाब बसालतजंग निजामुदौलास मेजमानी करीत आहेत. हैदरयारखानाचे बागांत तयारी मेजमानीची. रोशनी व दारू वगैरे लवाजमा भक्षायाचा, वस्त्रें, जवाहीर द्यावयासी पंचवीस तीस हजार रुपये तयारीस लागले आहेत. उद्यां अगर परवां बागांत नेतील. आजचे घडीपावतों बंधू बंधू स्नेहेंकरून आहेत. पुढें काय होईल तें विनंति लिहू. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.