Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ १०७ ] ।। श्री ।। ५ आक्टोबर १७५७.
पे॥ छ १९ मोहरम मंगळवार सा घटका रात्र उर्वरित.
सेवेसी विज्ञापना ऐसीजे. काल छ १८ मोहरमीं दीडप्रहर रात्रीं पत्र बाबासाहेबी डाकेचे जासुदाब।। पाठविलें त्याजवरोन अवगत जालें असेल. छ १९ मंगळवारी प्रात:काळी शोध केला तो लोक आले कीं काल निजामुदौला बहादुर आसफजंग तकियांत गेले होते. यापूर्वी विठोजी सुंदरहि तकियांतून होऊन आले. मग निजामुदौला गेले. जेव्हां तकियांत गेले तेव्हां शहामहमुदजी मशीदींत निमाज पढावयास गेले होते. निजामुदवला शाहामुसाफर याचे दरगांत जाऊन जीयारत केली. मग शाहासाहेब निमाज पढलियावर ऊजरियांत जेथें बसतात तेथें घेऊन गेले. वजीदअल्लीखानाहि समागमें होते. गोष्टी मातेंत तों चरपरेपण दिसोन आलें. शेवटीं गोष्टी शाहानवाजखानाची दरमियान आली. त्यास शाहजीहि बोलले कीं तो सैद आहे. आणि दाना व शिंदवी आहे. रहम त्याचे बाकांत जरूर आहे. वाजीदअल्लीखान नाही. लुकमा दिधला की जे आपण ह्मणतात तें सत्य आहे. त्यास शाहानवाजखानास पत्रें कांहीं वाजीदअल्लीखानाची गेलीं आहेत. शाहजींहीं निजामुदवलास पागोटें १ व कमान १ व तरवार येक ईनायत केली. अत्तर वगैरे दिधले. हें वर्तमान शाहाजीकडील असे. दुसरें, रा॥ लक्ष्मणपंत टकले याची भेट जाली. त्याजकडून कळों आलें की शामजीपंत निजामुदौलास रुकसत मागत होते कीं साहेबजादे हुल्या एकबल यांचे भेटीस जाऊं. मग वराडांत जाऊं. अगर जे आज्ञा करितील तें करूं. त्याचें उत्तर शामजीपंतास दिधले कीं आह्मीच चालणार वराडांत. ब॥ जाऊं या. तुह्मांस रुकसत करूं. दोन रोज ठेविलें आहे. शामजीपंत राहत नाहींत. निजामदवल्याचे सैन्यांत डेरा देऊन राहिले आहेत. आपण बाबासाहेबांस पुसोन सैन्यांत त्याचे भेटीस गेलों होतों. भेटी जाली. बहुत स्नेहांत माहाराजाचे दाखवून खुलासा पुसला. त्यास शामजीपंत ह्मणों लागले कीं राजाजीचा आमचा स्नेह पूर्व आहे. आह्मी येथवर उमेद देवितों. चतकोर मिळाली तर त्यांत त्याची आर्धी आह्मासीं वाटून खावी; त्यास स्मरण असेल कीं नाहीं. राजकीय वर्तमान तों जोंवर निजामदवला शहरीं पावलें नव्हते तोंवर याचे कारभारी आह्मासी साफ गोष्टी सांगत होते कीं नवाब निजामदवलाचा हेत कीं शहरात गेलियावर श्रीमंताकडील दारमदार जाला तोच सिद्धीतें पावावा व त्याचें यश घ्यावे. येथें आलियावर आह्मासी विचार चोरीत आहेत. खुलासा कळो देत नाहींत. बाह्यात्कारें तों नरमत्व रक्षितात; परंतु अंतर साफ दिसत नाहीं. ह्यणून आह्मीहि आपणास वोढून चढविलें आहेत. फार लागले जात नाहींत. शेवटीं कुंभाराची सून उकरडियावर येईल ऐसें बोलले. दुर्गाचें पुढिले ह्मणों लागले कीं अजून कांहीं सैनिक तेथे पाठवावें ऐसें नाहीं. एसें जालें तरी दारमदार कोठें राहिला? हे करणार नाहींत हें त्याचें जबानीचें वर्तमान. यानंतर काल चार घटिका दिवस राहतां राजश्री वासुदेव दिक्षीत सातारकर माहाराज अर्जुनबहादर, जानोजी जसवंत निंबाळकर याचे येथें आले होते. उभतांचा एकांत जाला. त्याजउपरि विठोजी सुंदर व मुरादखान ऐसे गेले होते.