Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[ ११० ]                                          ।। श्री ।।                           ६ आक्टोबर १७५७.

पे॥ छ २१ मोहरम सूर्योदय.

सेवेसी महिपतराव लक्षुमण सा।। नमस्कार विज्ञापना ऐसीजेः -
येथील वर्तमान त॥ छ २० मोहरम बुधवार सायंकाळ जाणून स्वानंदलेखनास आज्ञा केली पाहिजे. विशेष. छ १८ रोजीं निजामुदौला शाहमहमुदचे तकियांत गेले होते. तेथें खलबत केली कीं शहानवाजखानास लिहिणें. आमचे विद्यमानें येऊन मुलाजमत नवाबसाहेबाची करणें. तुमची तकसीर माफ करून जागिरा व मकान राहावयासी देवीत आहोंत. किल्ला सोडून द्यावा. बरोबर वाजदअल्लीखान होते. मुरादखान व विठ्ठल सुंदर उभयतां राजश्री जानोजी निंबाळकर याजपाशीं याचे मसलतीसाठीं परवां पाठविले होते. खलेल करूं ह्मणत आहेत. परंतु बिसालतजंगाची मिजाज सरकारकामावर कायम आहे. तिळतुल्य अंतर दिसत नाहीं. दरमियानचे लोक निजामदौलाची मिजाज बाहरम करून फितवा करावयाचे विचारांत गडबड करीत आहेत. परंतु बिसालतजंगापुढें कारस्तानी चालेल ऐसा अर्थ नाहीं. निजामअल्लीसी बहुत सलुख करून मेळवून घेतलें आहे. हैदरयारखानाचे बागांत मेजवानीचा सरंजाम होतो. उभयतां वडील बंधूस नेऊन मेजवानी शुक्रवारीं करणार आहेत. तयारीसाठी काजीजखान कोतवाल चार पांच दिवस जाले कीं बागांत जाऊन मजलिसीचा सरंजाम आतषबाजी व रोषनी वगैरे तमाम बागाचे आसपास चउत्रे बांधले आहेत. निजामअल्लीहि जवाहिर व कापड भावास द्यावयास खरीद करीत आहेत. तेहि आपले डे-यास नेऊन मेजवानी करण्याचे विचारांत आहेत. इतकियावर काय तजवीज होईल तें न कळे. शहानवाजखानांहीं शहामहमूद यास उत्तर लिहिलें कीं पूर्वीपासून जाबसाल श्रीमंताशी आहे. आतां अनेकाकडे लावणें उत्तम नाही. जें करणे तें श्रीमंत करतील. मेव्याच्या डाल्या तिघां भावांस पाठविल्या आहेत. अर्जी केली कीं बरावाईट तुमचा आहे. बेहत्तर जाणाल तें करणें. श्रीमंताचे ताकीदपत्र शहानवाजखानास आलें होतें की तुमची मर्जी कामाकाजाची व सलुख करावयाची अनेकाकडून होत्ये, हा भावार्थ काय आहे तो लिहिणें. उत्तर गेलें की जें होणें तें स्वामीचे विचारें होईल. उपडाचे पैगाम येतात; परंतु जें होणें तें साहेबाचे सलानें होईल. इतक्यावर काय होईल तें न कळे. शहरांत बाजारअफवा कीं मोर्चे पाठवू ह्मणतात. परंतु हे गोष्ट होतां दिसत नाहीं. इतक्यावर भगवत् इच्छा न कळे. सैदलष्करखानाचा भाऊ दिल्लीहून सैद आरफखान आले आहेत. त्यास सैदलष्करखानाचा किताब जाला असे. हैदराबाजेचे कोतवालास खलात जाला. थोरले नवाब ऐशआराम व बागाची सईल करीत आहेत. वरकड कामकाज बसालतजंग करितात. बहुत काय लिहिणें. हें विज्ञापना. राजश्री जानोजी निंबाळकर काल निजामअल्लीस भेटले. कळलें प॥. हे विज्ञापना.