Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ १०५ ] ।। श्री ।। ४ आक्टोबर १७५७.
पे।। छ १९ मोहरम मंगळवार दोन प्रहर दिवस.
सेवेसी भगवंतराव यादव दी। अवधूतराव केशव स।। नमस्कार विज्ञापना ऐसीजे:- कालचें वर्तमान श्रीमंत बाबासाहेबाचे पत्रांत लिहिले त्याजवरून अवगत जालें असेल. आज छ १८ मोहरमीं खोजे रहमतुलाखान बहादूर यांचे येथे गेलो होतों. पुसूं लागले कीं कांहीं राजियाकडील पत्र आलें कीं काय ? आपण उत्तर जवळ जाऊन दिल्हें कीं काल हकीम महमदअल्लीखानजीचे भेटीचें वर्तमान राजाजींचे पत्रावरून श्रुत केलें. त्याजउपर आज पत्रें आलियावर निवेदन केलें जाईल. मग फतहुदीअल्लीखान याची भेट घेतली. हे ह्मणों लागले कीं विशेष काही नाहीं. मागती भेटणें. पुरता शोध घेऊन सांगणें. त्याचे घरीं जाऊन जें सांगेल तें लेहून पाठवितों. हकीमजींही पत्र फतहुदीअल्लीखानजीस आपले इनामाचे गावाविषयीं व पंरडियाचे जाहगिरीविषयीं लिहिलें होतें. त्यास परवानगी इनामाचे गांवची व परंडियाचे जागिरीची ऐसे कागद दोन खोजे रहिमतुलाखानबहादूर यांही लालामहाराय वकील याचे हवाला केलें ऐसें हकीमजीस सांगणे. आज छ १८ सोमवारीं दरबार जाला. हैदरयारखान सेरजंग यांस पंचहजारीची तसलिमात जाली. पालखी झालदार इनायेत जाली. सयद कबीरखान बक्षी पातशाही यास झालदार पालखीची तसलिमात जाली. इजाफा पंचहजारीचा होणार. सफसीलानखान उभयतां अबदुल हुसैनखान हयदराबादेची सुभेदारी कुल इजारा केली. त्याजकडे रु॥ लाखो सरकारचे आहेत. त्याजकरितां अबदुल हुसेनखान सफसीलानखानाचा पुत्र येथें आहे त्याजवर तगादा ह्मणोन त्याणें जे जे अमील सफसीलानखानाचे अमलचे होते त्यांची इसमनवेशी लेहून दिल्ही. बहादूरसिंग ब-हाणपूरकर अमील त्याचे वेळेस होता. त्यास पंनास गाडदी पाठवून बेहुरकत करून नेलें. कळावें. आज छ १८ नवाब निजामुद्दवला बहादूर आसफजंग स्वार होऊन शहरास आले होते. बादली निमे अस्तीन ल्याल व कलगी खोविली होती. चार घटका बसले होते. स्वारीसमागमें स्वार पांचशे व गाडदी वगैरे होते. शाहामाहमुदजीचें त्याचें भाषण काय जालें आणि तबरुक काय दिधला याचा शोध पुरता सवसगियापासून घेऊन सेवेसी लिहितों. निजामुदवला शहरांत आले ह्मणून त्याचे मुख्य मुसाहेब वजीदअल्लीखान त्याची भेट जाली नाहीं. उदईक मागती जातों. आज्ञा होती कीं लालामाहाराय वकील याची भेट घेत जाणें आणि वर्तमान शोध घेऊन लिहिणें. त्याजवरून आज छ १८ चार घटिका रात्र जालियावर माहाराय वकिलाचे घरी गेलों होतों. त्यास ज्या युक्तीनें पुसावयाचें त्या युक्तीनें पुशिलें. त्याणें सांगितलें कीं लक्षुमणराव खंडागळे व इमराईमखान गाडदी हे दोघे एकत्र होऊन या विचारांत आहेत कीं दुर्गस्थाचें यश आपण घ्यावें. त्याजकडे सूत्र लावून लिहिलीं पुसलीं करितात. आज निजामुद्दवलास शब्द देतात कीं श्रीमंताकडे दारमदार करणें काय उचित होतें ? यांस सारेंच आज द्यावें. खोजे रहिमतुलाखान बहादूर बास्तेकर याजवर शब्द आणावा ऐसा मनोदय आहे. आजी मुख्य बंदगानअल्लीस शून्यातुल्य करावें हा हेतू त्याचा आहे. बाह्यात्कारें तिघे बंधु एकत्र होऊन विचार करितात; परंतु परस्परे संकोचित आहेत. वडिलांच्या उतराईत आहेत ऐसें लालामाहारायानें सांगितले. आजी ह्मणों लागले कीं मी इमराईमखान गाडदी याचेथें गेलों होतों; गोष्टीनें गोष्टी निघाली; त्यास आह्मीं इमरामखानास ह्मटलें कीं श्रीमंताशीं बिघाडून कोठे राहूं ? पाहातां येकल्या रघोजी करांडियाच्या वोहपियानें बरें न आलें.