Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[ १०६ ]                                          ।। श्रीदत्तात्रय ।।                               ५ आक्टोबर १७५७.

श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसीः -

विनंति आज्ञाधारक अवधूतराव केशव स॥ नमस्कार विज्ञापना त॥ छ १८ मोहरम सोमवार प्रहर रात्र सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. छ १७ तेरखेचें आज्ञापत्र सादर जाहलें तें आज तिसरे प्रहरी पावलें. त्यांत आज्ञा सादर जाहली कीं बारीक मोठें वर्तमान लिहीत जाणें. आज्ञेप्रमाणें आलाहिदा सेवेसी लिहिलें आहे त्यावरून श्रुत होईल. आणखी शहरचे लोक बारीक मोठें वर्तमान लिहितात त्यास स्वामीचे प्रतापें त्या सर्व गोष्टी मिथ्या असेत. आज रात्रीं आतांच खोजे रहिमतुलाखानांनीं मजला बोलाऊन नेऊन सांगितलें कीं लोक इमराईमखान गाडदी व लक्ष्मण खंडागळे वगैरे लबाडींत फिरतात; परंतु त्याच्यानें कांहीं कोणाच्यानें होणें नाहीं; आपले घरीं लबाडी बोलतात त्यास मनाइ कां करावी? त्याहींमध्यें या शहरचा अलम येक येक प्रकारचा आहे. आह्मीं जो श्रीमंताचे सेवेंत करारमदार केला आहे त्याप्रमाणें राजे जीवनराव यास ल्याहावें कीं श्रीमंतास विनंति अर्ज करून सत्वर निर्गमांत आणावा. येणेंप्रमाणें सांगितलें तें सेवेसी विनंतिअर्ज केली. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.