Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ १०९ ] ।। श्री ।। ६ आक्टोबर १७५७.
पे॥ छ २१ मोहरम गुरुवार सूर्योदय.
राजश्री राजे जीवनरावजी गोसावी यांसी:-
दंडवत विनंति उपरिः-येथील वर्तमान तर छ १८ मोहरमीं राजश्री विठ्ठलपंत दिवाण यांणी येऊन नवाब निजामदौला बहादर याचे मुलाजमतीचा मजकूर दरपेश केला. त्यासी उत्तर केलें कीं बंदगानअल्लीच्या आज्ञेविरहित हें करणें नाहीं. त्यावरून त्यांणीं गुलाम नक्षबंदखान यांसी सांगोन मुख्यास विनंति करून खानमजकुराचे हातची परवानगी आणविली. त्यासी आह्मी राजश्री विठ्ठलराव यांसी पाठवून गुलाम नक्षबंदखान यांसी सांगितलें कीं मुख्याचे हातचें पत्र असावें, त्याविरहित आह्मी तिकडे जाणार नाहीं. त्यांणी नवाब बसालतजंगबहादर याचे हातचें आज्ञापत्र हासल करून पाठविलें. त्यावरून छ १९ मिनहूस मंगळवारी राजश्री विठ्ठलपंत दिवाण संध्यासमयी येऊन मुलाजमतीस घेऊन गेले. मुलाजमत जाली. ज्या ज्या प्रसंगोचित इस्तियाकमुस्ता ह्या गोष्टी बोलावयाच्या त्या नवाब निजामदौला बहादूर यांणी बयान केल्या. तदोत्तर खिलवतात गेले. तेथेंहि शिष्टाचारविस्तार व आपले वर्तमान सांगितलें कीं आपण तरतुदीनें येथें आलों. सहा सात हजार फौज व पांच हजार गाडदी नोकर ठेविले. यामुळे दहा पंधरा लाखा रुपयाखालें आलों. उत्तर प्रतिउत्तर प्रियभाषण बोलणियांत आलें कीं आपण तों दाहापंधरा लाख रुपयाखालें आलों ह्मणतात; परंतु आमचेमतें पन्नास लाख रुपये आपण मेळविले. जे येसमयीं आपलें येणें गोया करामात जाली. ऐसे समयोपयोगीं बोललों. त्याउपर येक रकम शिरपेंच मुरसा आह्मास देऊन व सहित समागमीं अत्तर व पानदान देऊन रुखसत केलें. हवेलीस आलों. तुह्मांस कळावें ह्मणून लिहिल असे. हे विनंति.