Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

तुह्मांस कांहीं दोन चार परगणे मागणें तरी मागून आपल्या तालुकियास जाणें. श्रीमंताकडील दारमदार जाला तो कायम करवितांच तुमचें बरें आहे. ऐसे संशय कितेकप्रकारें त्याचें पोटांत घातलें. ऐसें महाराजें सांगितलें; परंतु हे गोष्टी दृढ नाहीं. ईश्वरसत्तेनें सर्व शत्रूचे तर्कवितर्क लयातें पावतील. इमराईमखान गाडदी याची तलब एक लाख दरमहा आहे. त्याजपैकीं जातीचे पंचाण्णव हजार व पांच हजार शागीर्दपेशा. त्याचे त्यास आतां गाडदी ह्मणतो कीं शागीर्दपेशाचे तों इनाम आहे; माझे तलबेंत मजुरा न घेणें. ऐसा बखेडा आहे. खोजे रहिमतुलाखान याचे लेकीस बरे वाटत नाहीं. ह्यणून तिसरा प्रहरां सैन्यांतून शहरास घरीं जात असतात. बाबासाहेब आज छ १८ रात्रीं स्वार होऊन सैन्यांत त्याचे घरीं गेले होते. ते डेरियांत नव्हते. मग माहाराज अपूर्ण बहादूर जानोजी जसवंत निंबाळकर याचे येथें गेले होते. सेवकहि समागमें होता. त्याजउपर शहरांत आलियावर महाराय वकिलाचे घरास गेला. त्याचें वर्तमान ध्यानास आणून पुढें खोजे रहिमतुलाखान बहादूर याचे घरीं रात्री गेलों तों घरातून बाहेर निघोन सैन्यांत डेरियास जात होते ते आपण जाऊन बाबासाहेबाचे तर्फे त्याचे लेकीचे खैरयतीचें वर्तमान पुशिलें आहे. आणि नकाहत ? असतां आपले भेटीस्तव सैन्यांत गेले होते. आपण घरीं आले ह्मणून भेटी न जाली. मजला खितमतींत पाठविलें आहे. राजाजीचेंहि पत्र आलें. हकीमजीस साहेबजादियाचे मुलाजमतीचें बाहरमद केलें. वितिपात जालियावर भाषण होईल. मग ईतला दिधली जाईल. ऐसें अवधुतरावजीस लिहिलें आहे. आजी हजरतेस बहुत बहुत स्तवीत आहेत. आणि लिहिलें आहेत कीं रोयेदाद जरूरी असेल ते हजरतेस पुसोन लिहीत जाणें. आजी त्याचा खुलासा काढावयास हे गोष्टी बोललों की हजरत खातरजमा ठेवीत. साहबजादियापाशीं व श्रीमंत पंतप्रधान साहेबापाशीं हजरतेचा स्तव फार केला आहे. कोण्ही मुखालीफ हरदाज कसील इमराईमखान वगैरे केले तरी त्याचें पारपत्यें बरें हाईल. मग ह्मणों लागले कीं राजाजीस लिहिणें कीं कोण्ही बरदाज नाहीं. खातरजमा ठेविजे. मुजफरखान गाडदी यास चौ घटिकात काढून दिधलें. त्याजपुढे इमराईमखान काय काळ आहे ? ऐशा गोष्टी बहुत मजबूदींनें खुश होऊन सांगितल्या. हयदरजंग राजबंदरीस पावले. हें सर्व वर्तमान बाबासाहेबास इतला देऊन त्याचे आज्ञेप्रमाणें सेवेसी लिहिलें असे. आजी तोफांचे आवाज दहा वीस केले. लोक बोलत होते कीं लेक जालियाचे खुसीचे किंवा मलमुर होय ह्मणून याचा संशय कांहीं नाहीं. परंतु जे आढळलें तें सेवेसी लिहिलें असे. फतहुदीअल्लीखान निजेले सांगोन पाठविलें कीं पाहाटे बाहेर येणें. त्यास प्रातःकाळीं जाऊन त्याची भेटी घेऊन शाहाजीचे येथील आणखी वर्तमान शोध करून इतला देतों. हे विज्ञापना. छ १८ दीडप्रहर रात्र.