Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२०] श्री. २६ जून १७९५.
विनंति विज्ञापना. शिंदे यांजकडील राजश्री, जिवाजी बल्लाळ यांचे जमीयतीपैकीं कित्येक पायदळीचे लोक त्यांनीं बरतर्फ केले. ते इकडे नवाबाचे सरकारांत येऊन इसामिया वगैरे यांजकडील सरदारांनीं दरमहा करून ठेविले. कमकसर दोन हजार तिकडील पायदळ लोकांची जमीयत यांनीं आपल्याकडे ठेविली. याशिवाय स्वारही कांहीं कांहीं येतात. त्यास ठेवीत आहेत. पेंढारी याजबराबर सरकारच्या पागा देऊन हिंदुस्थानांत रवाना केलें. त्यांजपैकी कांहीं पेंढारी पळाले. दोन तीनशें प्रस्तुत येथें आले आहेत. त्यांस लावून देणार आहेत. आणखी येतील कीं काय पहावें. र।। छ ८ जिल्हेज. हे विज्ञापना.
प्रतदफा