Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

याचप्रमाणें मदारुलमहाम राव पंतप्रधान यांचे घरचे पिढीजाद नौकर, त्यास आपले खाविंदावर वख्त येऊन पडला, पुढें तोरा ह्मणावा तर नाहीं, दौलत तर बुडालीच होती, कांहीं उपाय नाहीं, तेव्हां आपले नमकहलालीवर इरादा करून ईश्वरावर भार ठेवून उमेदीची इच्छा ठेवून कियासांत गोष्ट न यावयाची त्याचा अवलंब केला, ईश्वरें यांचे नमकहलालीवर नजर करून मनोदयानुरूप केलें, दौलतींत कांही बाकी राहिली नव्हती, त्या दौलतीस खाविंदांबरोबर रौनक आणली, हें सामान्य कर्तुत्व नाहीं, दुरंदेष मनुष्याचीच कार्ये आहेत, या बोलण्यांतील तात्पर्य हेंच कीं, या दोहीं दौलतींची यगानगत आजपासून आहे असें नाहीं, पुरातन पासून असेंच चालत आले आहे, जें करणें ते दोहींकडील सलाहानेंन होत आलें, प्रस्तुत सदाशिव रड्डी जमीदार यानें आमचे घरांत कैद केला, याची तदबीर कशी करावी हें राव पंत प्रधान व मदारुलमहाम यांस घराऊ रीतीनें लिहितों, तुह्मींही दोहीं दौलतींत परस्परें हुकूम कसे आहेत याचा बयान त्याचे मनांत यावयाजोगा आह्मीं सांगतों त्याप्रमाणें लिहून पाठवावें, आणि सांप्रतचे प्रसंगाचे तदबीरीस त्यांनीं अनुकूल असावें, याचा समेट कोणे प्रकारें करावा याची काय तजवीज मनांत येईल ती लिहून पाठवावी, यास विलंबावर टाकूं नये, जलद जवाब यावा. मदारुलमहाम नेकसलाह असेल तीच लिहितील, आह्मी तुमचे पत्रावर हवाला घालून लिहितों. ह्मणोन पत्रें तयार करून लागलींच दिलीं तीं सेवेशीं पाठविलीं आहेत. अवलोकनें ध्यानांत येईंल. सारांश नवाबाची आणि सरकारची यगानगत आजपर्यंत रसायनानें चालत आली. पुढेंही ईश्वर असेंच चालवील. सांप्रत नवाबाचा जइफीचा वक्त. या समयांत स्वामीस हेचं लाजीम आहे कीं, नवाबास या समयांत कांहीं दुःख होऊं न द्यावें. दोन्ही दौलती एक. तेव्हां या दौलतीचें उणें तें आपलें असें समजोन बंदोबस्ताची षकल आणि तदबीर नेक असेल ती करावी. आणि नवाबासही लिहून पाठवावें. त्याप्रमाणें हेही करितील. नवाबाचें मानस श्रीमंतांनीं अनुकूल होऊन बंदोबस्ताची षकल करावी. आह्मांस खातरजमेनें लिहून पाठवावें. माझे मनांत ऐसें येतें कीं, जमीदाराची नड किती? अलीज्याहा तोरा हातांत घेऊन बसला आहे, त्यास अलीज्याहा व रड्डी यांस सरकारांतून रीतीच्या गोष्टी सांगून नशियत करावी. ऐकिल्यास उत्तम. नाहीं तर एके धुरकींत हातपाय गळून जातील. मकदूर किती? ऐसेंच करावें, हें माझे सलाहांत आलें. तें लिहिलें आहे. याजवर स्वामीचे मर्जीस नेक सलाह येईल त्याप्रमाणें लिहावें.ह्मणजे नवाबाची खातरजमा करण्यांत येईल. उत्तरें पाठविण्यास विलंब नसावा. र।। छ ६ माहे मोहरम. हे विज्ञापना.