Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[८५]                                                                               श्री.                                                                            २३ जुलै १७९५.

विज्ञापना ऐसीजे. अलिजाह बहाद्दूर बेदर येथें आहेत. किल्ला व शहरपन्याचा बंदोबस्त करून चिंचोली, कुहीर, तांडुर, हसनाबाद वगैरे भोवते तालुकियांत जमीयत लोक पाठवून कित्येक जागीं ठाणीं बसविलीं. पांच सहा हजार स्वार, दहा हजार पायदळ, ह्याप्रमाणें जमीयत सदाशिवरड्डीपाशीं आहे ह्मणून वर्तमानें येतात. मुसारेमू यानें संगारडी पेठ घेऊन तेथेंच होता. घासीमिया व महमद अजमखान पागावाले व जोधसिंग खंदारकर व सुभानखान वगैरे नवाबाकडील सरदार यास हुकूम झाल्याप्रमाणें हजार बाराशें स्वारांचे जमीयतीनशीं संगारडीस मुसारेमू व हे एक जागीं झाले. संगारडीस पैदलची जमीयत थोडीबहुत ठेवून तेथून पागावाले मुसारेमू वगैरे सरदार आपले जमीयतसुद्धां निघोन जोगीपेठेस जाऊन आंदोळ सदाशिवरड्डीकडील महसरा केला, तेथें आंदोलांत रड्डीकडील पायदळ दोन अडीच हजार पावेतों आहे. मोर्चेबंदी केली आहे. इसामिया याजवर षबखून पडल्याचें वर्तमान उठलें होतें. त्यावरून या मजकुराची विनंति ऐकिल्याप्रमाणें पेशजी लिहिण्यांत आली. त्यास इसामिया पंधरावीस स्वारांसुद्धा हैदराबादेस येऊन नवाबाची मुलाजमत झाली. इसामियाचे लोकांशीं व त्याचे तालुक्याचे जमेदारांशीं कटकट होऊन लोक कांहीं जखमी झाले. सदाशिवरड्डीस जखम लागून शेवट झाला, हेंही वर्तमान एक दोन दिवस दाट होतें. परंतु रड्डीमशारनिल्हे. बेदरांत साहेबजादे याजपाशीं आहे, हें तहकीक खबर येथें आली हैदराबादेंत दरवाजाचा व हवेलीचा बंदोबस्त ज्याबज्या चौक्या पाहरे ठेऊन पक्का केला आहे. येणार, जाणार, घोडीं, तट्टें, माणसें, उंट वगैरे यांस परवानगीशिवाय बंदी आहे. भणंग, भिकारी, दासरी, भोरपी वगैरे तिकडून येतात व इकडून बातमी पोंचवितात. ऐसेंही समजावणा-यांनीं समजाविल्यावरून ताकीद झाली कीं, दासरी वगैरे लोक तेलंगे, कानडे यांस अटक करावी. त्यावरून शहरचे सुभे व कोतवाल यांनीं शहरांत उघडे बोडके ब्राह्मणसुद्धां सांपडले ते शेंपन्नास माणूस धरून दोन दिवस अटकाविले. कागदपत्र शहरांत कोणाचे येतात व येथून जातात ते चौक्यांवरून धरून चौकशी करावी हेंही होत आहे. रायराया रेणूराव यास बाहेर डेरेदाखल होण्याची रुखसत छ १ मोहरमीं नवाबांनीं दिल्ही. त्याप्रमाणें फत्तेदरवाजाबाहेर ताडबनांत जाऊन उतरले. समागमें नफरूदौला व दौलतखान व मनमोहनराव पिंगळे व सुलतानखान, सरमष्तखान वगैरे मिळाले. तीन चारशें स्वारांशिवाय पैदळ, गाडदे वगैरे जमीयत आहे. मनसबदार व सरदारांस ताकीद कीं, राजाजीजवळ जाऊन रहावें. त्याप्रमाणें कोणी कोणी वरचेवर जात आहेत. रायरायां दिवसा नवाबाकडे येऊन दरबार करून तीन प्रहरास डे-यास जातात. रात्रीं तेथेंच राहतात. सांप्रत मोहरमचे आपु-याचे दिवस. शहरांत तमाम सर्वांस ताकीद आहे कीं, डोल्याची मिरवणूक होऊं नये. व जान साहेबाची स्वारी प्रतिवर्षीं निघते, त्यासमागमें मनुष्यें फार असतात, स्वारी निघाल्यास बलवा होंईल हें समजून ताकीद कीं, स्वारी निघणें मवाकुफ, लंगर निघणें तेंही दहावीस पंचवीस माणसेंसुद्धां दिवसा नेमणूक केल्याप्रमाणें निघावें. ऐसी बहुत यहतिहात करविली. तात्पर्य, सालाबाद मोहरमचा समारंभ होतो तसा साल मजकुरीं नाहीं. ताकीद आहे. अबदूल करीम कुमदाल यांचे रिसाल्याची गारद, त्याची तलब तनखा चहडली, सबब छ ४ रोजीं गारदी पैदळचे लोक देवडीवर येऊन गवगवा रात्रीं झाला. रोषनराव यास धरून बसविलें होते. तो निघोन गेला. चार घटका कटकट पडली होती. दिलदारखान व सैदउमरखान दरम्यान येऊन गारद्याची समजूत करून वाटे लाविले. खासवाड्याचे चौकीस हे गारदी नसावे याप्रमाणें ताकीद झाली. छ ६ मोहरम. हे विज्ञापज्ञा.