Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
आह्मीं जरीदा भेटीस येतों, असें पत्र मदारुलमहाम व रावपंत प्रधान यांस लिहिलें होतें, त्याचा जवाबही तयार झाला, परंतु आह्मांस पावला नाहीं, कोठें राहिला असेल तो असो, पुढेंही तुह्मांस दौलत खाही. मंजूर असेलच. असें खोंचून बोललें. याचें उत्तर दिलें जे, इतक्या गोष्टी फर्माविल्या ह्या ख-या, ह्या सर्व गोष्टींची कैफीयत श्रीमंतांस आहे, मदारुलमहाम यांनीं तर जातीनें वहिवाटच केली, तेव्हां याचें विस्मरण कसें होईल ? नित्य हेंच त्याचें. ह्मणणें जें हजरतीची आमची दोस्ती आणि इतेहाद पूर्वींपासून जो आहे त्यांत खलष न यावा, जे खलष आणीत असतील त्यांचे कोते अंदेशावर नजर न देतां तनहाईंत सफाई व्हावी, मामलतीचा जाबसाल वाजवी फडच्यांत यावा ह्मणजे आणखी कांहीं आह्मांस दरखास्त नाहीं, दूरदेशींचे मागें ही गोष्ट हजरतीचे मनांत न आल्यास आमचा उपाय नाही, मामलत तर उगविली पाहिजे, यासाठीं खिसारा फौजेस पडेल तर ही बाबत मुलुखावर आहे, हजरतीशीं आह्मांस दुसरा प्रकार करावयाचा नाहीं, असें मरातीब हमेष बोलण्यांत येतें, हेंच मीरअल्लम व राजे रेणूरावजी तेथें होते त्यांस पुसावें, तेव्हां उभयतांनीं रुकार दिला, माझे बोलण्यांतही हमेषा असेंच आलें होतें, परंतु कारपरदान याचा अर्ज आपल्यास मान्य पडून इरादा लढाईचा धरिला, त्यासमयीं श्रीमंतांची आज्ञा मला झाली कीं, आमचा इरादा नवाबाशीं विपरीत नाहीं, असें असून त्याचा कस्त लढाईचा असल्यास वचनप्रमाणाशिवाय गोष्ट झाली, याचा हवाला ईश्वरावर आहे, ज्यास ईश्वर यश देईल तें खरें, करारमदाराची गोष्ट राहिली नाहीं, आपले काबूची गोष्ट प्राप्त, हजरतींनींच वचनावर दृष्ट ठेविली नाहीं, तेव्हां आज आमचें बोलणें आहे तें निश्चयाचें मानूं नये, घांट उतरल्यावर ते। मोहराच अलाहिदा, इतक्या बाबती अर्ज करण्यांत आल्या, परंतु याचां विचार न झाला. ईश्वराचे इच्छेस आलें तसें झालें, नंतर खरड्याचे मुक्कामीं मला आपण श्रीमंतांकडे पाठविलें तेसमयीं श्रीमंतांस विनंति जे करावयाची ते रदबदलीनें फार केली, तेथील आज्ञा झाली कीं, आमचेकडून कोणतीही आगळीक झाली नाहीं,