Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१५] श्री. १६ जून १७९५.
विज्ञापना ऐसीजे. नवाबांनीं खरड्याहून एक पत्र सरकारांत लिहिलें होतें कीं, आह्मींच तेथें येतों. तेवेळेस मीर अल्लम याचे विचारें जाब लिहिला कीं, मुजाका नाहीं, तनहा यावयाचें करावें. नंतर पुन्हां असें ठरलें कीं, असा जाब लिहूं नये. फडच्या झालियावेगळ आपलें येणें सल्लाह नाहीं. दोन्ही पत्रें मजकडे पाठविलीं, आणि आज्ञा केली कीं, यांत सल्लाह चांगली असेल ती समजून जें पत्र देणें तें द्यावें. नंतर दुसरें पत्र होतें ते मी दिलें. पहिलें पत्र दिलें नाहीं. तो विचार मीर अलम याशीं विश्वासानें सरकारांतून झाला. ती गोष्ट यांनीं नवाबास समजाविली कीं, हजरतीनीं पत्र पाठविलें. आपले येण्याविषयीं त्याचा जाब मीं मदारुलमहाम यांशीं बोलून ऐसा ठरविला कीं, तनहां यावें यांत फार काम होतें, हजरत जर येते तर त्यास मुरुवत पडून मुलुखाची बाबत अगदीं मौकूफ होत होती, त्यास हीं पत्रें मदारुलमहाम यांनीं गोविंदराव यांजकडे पाठविलीं तीं त्यांनीं हजरतीस दिलीं नाहींत असें होऊं नये, दुसरे त-हेचें पत्र यावें असें गोविंदराव यांनीं लिहिलें, मदारुलमहाम यांनी दुसरें पत्र लिहून पाठविलें, आणि असें लिहिलें कीं, दोन्ही पत्रें तुह्मापाशीं आहेत, जें देणें तें द्यावें, जर हजरतीचे येण्याविषयीं मीं राजी करून जाब लिहविला, तें पत्र पोहोंचून हजरत येते, तर भुरुवतीनें मोठें काम झालें होतें, हें न होण्यास मूळ गोविंदराव ऐशीयाचीं कर्मे असतां आपण त्यास दौलतखाह कसें ह्मणतात, मला तर असें वाटतें कीं, त्यास हजरतीनीं आपलेजवळ ठेवणें सलाह नाहीं, हजरतीचे दौलतीस घात आहे. याप्रमाणें चित्तास येईल तसें समजावून पुढें बोलतात कीं, कदाचित् हजरत ह्मणतील कीं, राव पंत प्रधान व मशरुलमहाला यांनीं गोविंदराव याजविषयीं आदृ धरिली, यास कसें करावें, त्यास याविषयींची काळजी हजरतीनीं करूं नये, गोविंदराव यांनीं या कामांत असावें, याविषयीं त्यांसही संतोष नाहीं, याचें साधन मी करून देईन. ऐसाबीर दिला. याविषयीं सरकारांत व राजश्री नानांस पत्रें लिहून द्वारातरें पाठवावीं, ऐसाही विचार होत आहे. र।। छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.
छ ८ जिल्हेज, मु।। भागानगर
रवाना टप्यावर.