Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९] श्री. २६ जून १७९५.
विनंति विज्ञापना. छ २२ माहे जिल्काद बुधवारीं नवाबाची सालगिरेचा दिवस. नजूमियास बोलावून साअत पांच घटिका रात्रींची ठरली. तयारीविषयीं गनीयारखान यांस सांगितलें. नेमाप्रमाणें रात्री पांचवे घटिकेस हाकीम जाफरखान व गनीयारखान हजर झाले. गुल अनारी रंगाचा पोषाग व जवाहीर, सरपेच, जिगा, कंठी, दस्तबंद, भुजबंद घेऊन हकीम मजकूर यांनीं सालगिरेची गांठ, नवाबास बांधिली. बाहेर आल्यानंतर त्यांनीं नजरा केल्या. दुसरे दिवशीं अलीजाहा बहादूर व शिकंदरजाहा सुभानअल्ली वगैरे सर्व साहेबजादे व बसालतजंग यांचे पुत्राची याद केली. हजर झाले. त्यांच्या नजरा झाल्या. फुलाचे हार त्यास दिले. प्रहर दिवसा तें आपलाले हवेलीस गेले. सालगिरेचा. समारंभ चार पांच दिवस नित्य नजरा होत आहेत. र।। छ ८ जिल्हेज. हे विज्ञापना.