Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१७] श्री. २६ जून १७९५.
विनंति विज्ञापना. इसामिया याजकडे पेशजी नलगुंडा, देवरकुंडा वगैरे भवानगिरी सरकारचे महाल आहेत. अलीकडे वरंगळ, खमम वगैरे त्यांचे लगते तालुके त्याजकडे सांगण्याचा बेत ठरून बोलणें होत आहे. त्रिमलराव सुरापूरकर याजकडे नवे महाल कनकगिरी, गजींद्रगड वगैरे यांचें बोलणें लागलें. बादबहालीच्या सनदा खिलत नाहीं. महमद अमीखान याजकडे कडपे तालुका आसदअल्लीखानाकडील सांगून खान मजकूर यास पेशजी रवाना केलें. तालुक्यांत गेले. आसदअल्लीखान याजकडे गुडमठकल, नारायणपेठ,बैंगलपली इतके राहिले. खान मजकूर याचें बोलणें आणिक तालुक्याप्रकरणीं आहे. त्यावरून मंगथळ वगैरे चार महाल सांगावे अशीही योजना आहे. अद्याप कोणताही निश्चय नाहीं. होईल त्याप्रमाणें विनंति लिहिण्यांत येईल. र।। छ ८ जिल्हेज. हे विज्ञापना.
[१७] श्री. २६ जून १७९५.
विनंति विज्ञापना. मृगनक्षत्र निघाल्यानंतर दोन तीन न्य हैदराबाद प्रांतीं पडले. येथें शहरांतही दोन पाऊस बरेच झाले. मुसा नदीस पाणी आलें. तलाव भरपूर होऊन नहर अद्याप ज्यारी नाहींत. पेशजी येथे गल्ल्याची धारण होती त्याजहून विशेष स्वस्ताई व्हावी ह्मणून महसूल नानकराम करोड्याचे अमलांत चालत होता; त्यां बमोनीब घ्यावा ऐसा बेत ठरला होता; परंतु महसूल अद्याप कमी न होतां अलीकडील शिरस्त्या बमोजीब घालतो तसाच आहे. हल्लीं धारणीची गिराणी तांदूळ सात शेर, गहूं हरभरे नऊ शेर, जोरी अकरा शेर, कडबा साडेपांच रुपये शेंकडा, या अन्वयें निरख प्रस्तुतचा आहे. र।। छ ८ जिल्हेज. हे विज्ञापना.