Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[८३]                                                                               श्री.                                                                            २३ जुलै १७९५.

विज्ञापना ऐसीजे. मिरअलम व रेणूराव वगैरेनीं आपापले घरांतील चीजवस्त सर्व लांबविली. सर्व लोक सावधगिरींत आहेत. आंतून धर सर्वांचा सुटला. मीरअलम यांनीं आपलें कुटुंबही घरांतून काढलें, याची खबर कोणासही नाहीं. बारीक बातमी लागली. मुख्याचा विश्वास कोणास नाहीं. साई आहे त्यांचाहि विश्वास नाहीं. काल नवाबानीं मिरअलम यास सांगून पाठविलें कीं, तुह्मीं आपलें बचावाची यहतियात करीत जावी, सावध असावें. याजवरून त्यांचे हातपाय गळाले. ही अवस्था येथील आहे. नबाब बहुत फिकीरींत आहेत. अन्न चांगलें भक्षीत नाहींत. रात्रीं निद्रा येत नाहीं. एक स्थलीं बसत नाहींत. शहरांत बोलवा कोणते वेळेस काय उठेल यात्रा भरंवसा मानीत नाहींत. याप्रमाणें आहे. येथील राहणार यांच्या अवस्था अशा. तेव्हां मीं काय उपाय करावा ? कांही सुचत नाहीं. स्वामींचे पायांचें स्मरण करून धैर्य धरून आहें. र॥ छ ६ मोहरम. हे विज्ञापना.