Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
आह्मांसचं कारभार सांगावा, असें आमचें ह्मणणें नाहीं, जो चित्तास बरा वाटेल त्यासच सांगावें, आह्मी सर्व त्याशीं रुजू राहूं, परंतु एकास पुढें करून त्याजवर भार टाकल्याव्यतिरिक्त परिणाम नाहीं, चहूंकडून चार बोटें घालतात, एकासही ठिकाण नाहीं, मुलुखाचा अथवा मामलतीचा बंदोबस्त नाहीं, मुषीरुलमुलूक यानीं तालुक्यावर ताहूद केलें तें मोडावें आणि आमानी करावी हें आमचें मानस, नवबाचें ह्मणणें मषीरुलमुलूक यानीं केलें त्याजपेक्षां आह्मीं अधिक करावें, नाहींतर तो कारस्थानी होता, आह्मीं खुद्द खावंदगिरीनें करूं लागलों आणि नुकसानी करून घेतली हा लौकिक होईल, तेव्हां काय आमचें करणें ? असें बोलतात, परंतु किफायत ह्मणजे काय हें कांहींच समजत नाहींत, कागदावर रकमा वाढवून दाखवाव्या यांत फळ काय याचा विचार नाहीं, हें कोणीं समजवावें. तेव्हां त्यास ह्मटलें, असें कां करितां ? तुह्मी आणि राजाजी मिळून समजावून सांगावें ह्मणजे होईल, विचार करीत बसल्यानें कांहींच होत नाहीं. तेव्हां ह्मणाले, आठ पंधरा दिवस वाट पाहतों, नाहीं तर तालुक्याचे बंदोबस्ताकरितां निरोप घेऊन कोपळाकडे जाईन. तेव्हां त्यास ह्मटलें, मग आह्मीं तरी कशास रहावें, आह्मांस निरोप देववा, मग तुह्मीं जावें. असें बोलतों इतक्यांत नवाब बरामद झाले. मग सारेच उठून तिकडे गेलों. चालतांना त्यास ह्मटलें, तुह्मीं कांहीं सांगणार होता तें काय? हळूच बोलले कीं, राजाजी जवळ आहेत, बोलूं नये. राजाजीवेगळ बोलावें हें त्याचे मनांत. परंतु अवसर नाहीं. राजाजी याचें मानस कारभारांत आपण असून सा-यावर चर्ब असावें. मीर अल्लम याचे मनांत आपण सा-यावर चर्ब असावें. हे आंतील प्रकार खरोखर आहेत. राजाजी याची पेष नवाबाजवळ विशेष आहे. परंतु धर धरून बोलण्यास हिम्मत होत नाहीं आणि वजन पडत नाहीं. अशा नाना प्रकारच्या तिढणी आहेत. आणखी बहुत विस्तार किती लिहूं ? गोषवारा लिहिला आहे. राजे रेणूराव यास हिताच्या गोष्टी सांगून कांहीं वळणावर आणिलें आहे. आणखी बोध करून वळणावर येतील. त्याची प्रकृत सरळ आहे. परंतु सेाबती चांगले नाहींत. याजमुळें बुद्धीस भ्रंश होतो. वास्तव्य खुनशी नाहीं. प्रस्तुत काळीं रघोत्तमराव प्रथमच विचारांत पडले आहेत. पहिल्यानें विचार करून ठेवणी राखून खावंदाशीं बोलावें ते बोलले नाहींत. भरीं भरून चित्तास येईल तसें बोलत गेले. आतां उलगडणें कठीण पडलें.
ऐसा प्रकार. र।। छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.