Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९९] श्री. १ अक्टोबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. सरकारचें पत्र किस्तीविशीं आलें तें नवाबास दिलें, त्याचा जबाब नबाबानीं दिल्हा. याचा मसविदा वाचून दाखविला, आणि सांगितलें कीं, तुह्मींही याप्रमाणेंच लिहावें. तेव्हां विनंति केली कीं, अलीज्याह यांचे मझेल्याची सबब असूं नये. ते बाबत अलाहिदा बीअलाहिदा. अलीज्याह यांची ताकद काय? दोहीकडील दोस्ती आणि यगानगतेंतही बाबत किती ? पदार्थ काय? मार्गाची गोष्ट सांगितली असतां न ऐकिल्यास त्यास उठावून घेणें अवघड नाहीं. याकरितां ही सबब करारमदारी मुकदम्यास लावूं नये ऐसा तेथून लेख आला. तेव्हां बोलिले कीं, हाही मुकदमा लांबत नाहीं. लवकरच उलगड्यांत येईल. तुह्मीं नीट समजावून लिहावें ह्मणजे श्रीमंत व मदारुलमहाम समजतील. याजवर कदाचित् तेथील खातरजमा न होय तर तुह्मीं येथील कोणी आपलेबरोबर घेऊन जाऊन श्रीमंतांची खातरजमा करावी कीं, वाजवी मुकदमा ठरावांत आल्यावर त्यास दिकत नाहीं; परंतु भेटी परस्परें व्हाव्या. अथवा भेटीचे अगोदर किस्ती आदा होत, त्याप्रमाणें ठराव ज्यारी करावयाची त-हा होऊन भेटी व्हाव्या; परंतु भेटीवेगळ खुलासा नाहीं. तेच वेळेस तहनामा साफ करावा, हा बोलण्याचा भाव. याजवर एक गोष्ट पुसली कीं, माझे पाठविण्याविशीं आणि पुढें ठराव व्हावा असें आपण लिहिलें याविशीं मी काय लिहावें ? तुह्मांस पाठवून निभावणी होईल अशा किस्ती ठराव्या ह्मणजे काय ? हजरतीचे मनांतील काय अर्थ ? याचा खुलासा तर माझे लिहिण्यांत आला पाहिजे, याचें कसें लिहूं ? किस्तीपैकीं कांहीं षुरवात हजरत करतील कीं नाहीं याचें कसें ? केवळ शुष्क गोष्ट लिहिणें हें कसें त्यास वाटेल? तेव्हां नबाबानीं द्रिष्ट रोषाची करून बोलले कीं, अगोदर हें पत्र तर जाऊं द्यावें, व हें पत्र पोंहचून जाब आला नाहीं तों काय सांगावें ? मर्जीत भास कांहीसा असा दिसला कीं, हें पत्र गेलियावर श्रीमंत व मदारुलमहाम ऐकतील, नंतर याची षकल पाहूं तशी काढू. हे आजच आपलेकडून कां निकड करून पुसतात ? असा मर्जीचा भाव डोळ्यावर दिसतांच मीही समेटून घेतलें कीं, जशी आज्ञा असेंच लिहितों. तेथून लिहिलें आलियावरच अर्ज करीन. सारांश प्रस्तुत कांहीं द्यावयाचें ध्यान दिसत नाहीं. निभाव होय अशा किस्ती ठरवून भेटीचें ठरवावें तेव्हां जे किस्त ठरेल ती आदा करतील. किस्ती तरी कशा किती दिवसांच्या हेंही बोलत नाहीं. मोघम बोलून चार दिवस ढकलावे. नंतर काय उत्तर येतें हें पहावें. मग यांची रवानगी करावी. हे जाऊन बोलतात तोंपावेतों घरचें मझेल्याचें कसें होतें हेंही पहावें. पुढें रदबदल किस्तीची घालीत बसावें. असें लांबणीवरचें ध्यान आहे. नबाबाचे पत्रावरून सर्व कळेल. आज्ञा येईल त्याप्रमाणें बोलण्यांत येईल. र।। छ १७ र।।वल. हे विज्ञापना.