Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९८] श्री. १ अक्टोबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. मीरअलम यांनीं राजश्री रघोत्तमराव यांजबरोबर सांगून पो। कीं नबाबाशीं बोलणें झालें तें सर्व सांगावें. नबाबांनीं उत्तरें दिलीं तींही समजलीं. त्यांत दोहों गोष्टीविषयीं मला बहुत चटपट लागली आहे. कसेंहीकरून दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. नबाब तर समजत नाहींत. हट्टी प्रकृति, सरळ मार्गानें फडच्या करतील असें दिसत नाहीं. याजकरितां जें मनांत आलें तें सांगावें. एक श्रीमंतांशीं करारमदार जाला त्याप्रमाणें अमलांत यावें याची षकल ठरावी. दुसरें अलीज्याह यांची समजूत पडावी. राजाज़ीशीं सफाईचें बोलणें जालें त्याप्रमाणें अमलांत तर मजकडून यावें. नबाबास समजावून सांगावें. तर ऐकत नाहीं. अलीज्याहाविषयीं श्रीमंतांचीं पत्रें आलीं तीं रावजी देतीलच. परंतु उत्तर चांगलें होणार नाहीं. याची तजबीज एक आहे. माझी रवानगी हजरतीनीं केली त्यास मी बेदरास जातों. मजकडे, अलीज्याह यांजकडील पैगाम घेऊन येईल त्याजबरोबर सूचना त्यास करतों जे, तुमचा टिकाव येथें होणार नाहीं. तेव्हां ते तेथून निघोन तिकडे येतील. त्यांस येऊं द्यावें. आह्मीं पाठलाग करूं. श्रीमंतांचे तालुकियांत गेलियावर आह्मीं अलीकडेच राहूं. तेवेळेस नबाब तुह्मांस श्रीमंताकडे रवाना करतील, तुह्मांस जावें लागेल, ऐसें नबाब पूर्वीं बोललेच आहेत. इकडून कोणी पाठविणार तेव्हां मलाच पाठवितील. अगर आणखी कोणास योजिल्यास फलाण्यास पाठवावें असें तुह्मीं ह्मणावें, ह्मणजे जा ह्मणतील. तुह्मीं आणि मी पुणियास गेलियावर श्रीमंतांचा जाबसाल ठरवून घेऊन अलीज्याह याचा जाबसाल ठरविण्यास चांगलें पडेल. नंतर मुलाकातीचा प्रकार धोरणानें करावें, तर जाबसाल उलगडतील, अलीज्याह यांचा बंदोबस्त होऊन नबाबाचे दौलतीचा खलष उठोन आबादानी होईल तर सारे दोस्तीची मजबुती. अशावेगळ कांहींच बनावयाचें नाहीं. हट्टी स्वभाव यास ताळ्यावर आणावयाची हीच षकल. यांतही नबाबाशीं नमकहरामी करावी असा प्रकार नाहीं. जशी ज्याची समज तसें समजवावें तेव्हां समज पडती. यास काय करावें ? हेंही यांचे दोलतीचे रूबंदोबस्ताकरितां धरणें यास बाध नाहीं. हीच मसलहत श्रीमंतांस व मदारुलमहाम यांस लिहून पाठवावे. उत्तर येईल तें कळवावें. यास विलंब लागूं नये. यांत तीन तोडी होतील. श्रीमंतांचा फैसला, अलीज्याहचा बचाव, नबाबाचे दौलतीचा बंदोबस्त. याविशीं इंग्रेजासही बरीक करून घेऊन त्यांजकडूनही नबाबापाशीं बोलवितों. सहजांत सर्व होतें. याविशीं अनमान करूं नये. याप्रों। रावजीशीं बोलून तिकडे लिहून पाठवावयाचा निश्चय करून मला येऊन सांगावें. ह्मणजे त्या धोरणाप्रमाणें चाल घालतों. उदईक कुच आहे. त्या अगोदर निरोप कळवावा ह्मणजे स्वस्थ. याप्रों। रघोत्तमराव यांनीं सांगितलें. त्यास ह्मटलें कीं, मीरसाहेब यांचें पत्र सरासरी मोघम असतें तर बरें. ते ह्मणाले दरवाजावर परवानंगी रसानगीची दिकत, मीच पत्र आपलें देतों. त्याजवरून रावम।।र यांनीं राजश्री गोविंदराव भगवंत यांचे नांवाचें पत्र मोघम माझे पत्राचा हवाला घालून लि।। आहे. तें पत्र स्वामीचे सेवेशीं गोविंदराव दाखवितील. र।। छ १७ र।।वल. हे विज्ञापना.