Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२१]                                                                               श्री.                                                                           २६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. नवाबाकडे सांगून पाठविलें होतें कीं, मला कांहीं अर्ज करणें आहे. तेव्हां त्याचा निरोप आला जे तनहाईंत बोलावयाचें किंवा कसें ? जर तनहाईंत बोलावयाचें असें सांगून पाठवावें तर, विप्र आणि यवन वाईट मानतील. आणखी कोणादेखत बोलावें तर किती एक गोष्टी बोलतां येत नाहींत. दोहींकडूनही अडचण. तेव्हां सांगून पाठविलें कीं, जशी आपली मर्जीं. नंतर दरबारास गेलों. इमतीयाजउद्दवला, भाचे वैगेरे कुल जमा झालें होतें. मी जातांच नवाब उठून माडीवर चालले. मला बोलाविलें. मीरअल्लम आणि राजे रेणूराव व रघोत्तमराव त्रिवर्गांस बोलाविलें. वरतें जाऊन बसल्यावर, मी, प्रश्न केला कीं, मला येऊन महिना होत आला, अद्याप एका गोष्टीचाही जबाब नाहीं, लोकांत नानाप्रकारच्या अफवा उठतात, इंग्रजांशीं राजकारण, चाललें आहे, बादजबरसाद तदारुम करावा ऐसाही बेत होत आहे, ही गोष्ट बुद्धीनें ध्यानांत येत नाहीं, परंतु आफवा फार आहे, याची आखबर खावंदास अलबत गेली असेल, माफक पत्र अद्याप कांहींच नाहीं, तेव्हां त्यांचे मनांत अंदेशा येईल, मजवर शब्द येतो, त्यास मी खावंदास काय लिहावें ? जसें आपण सांगतील तसें लिहीन, करारमदार झाले, त्याजवर अम्मल होईल किंवा कसें ? याजवर नवाब बोलले कीं, आफवाई गोष्टीवर मदार नाहीं, आणि मनांतही कांहीं न आणावें, तशी गोष्ट व्हावयाची नाहीं, आणि करारमदारांत अंतर करावयाचें नाहीं. ऐसें बोलून मीरअल्लम व राजे रेणूराव यांजकडे पाहून बोलत असतां मजकडे अवलोकन करून बोलत होते जे, खरड्याचे मुक्कामीं जें तुह्मांशीं बोलत गेलों तें दौलतखाह ह्मणून बोललों, पूर्वीं राक्षसभुवनची लढाई झाली, तेवेळेस तुमचे तीर्थरूप कृष्णरावजी होते, आह्मीं औरंगाबादेस गेलों, रघुनाथराव व माधवराव उभयतां सरदार तुमचे येथील, त्यांनीं दहा लक्षांची जहागीर तवाजा करून समजाविष केली, कृष्णरावजी आले होते, त्या गोष्टी आमचे मनांत साबीत होत्या, ह्मणून कृष्णरावजी यानीं आमचें वचन घेतलें कीं, मातुश्री गंगाबाई गरोदर आहेत, सर्व सेवक लोकांस उमेद अशी आहे कीं, आह्मांस खावंद होतो, याजकरितां, आपली मदत सर्व प्रकारें असावी, त्यावेळेस हे श्रीमंत गर्भांत होते, काय होईल न होईल याचा अंदेशा न करितां आह्मीं मदतगारी केली, त्या गोष्टी झांकल्या नाहींत, तेच श्रीमंत आतां आहेत, मदारुमहामही ते वेळेपासून माहीत, जे कृष्ण रावजी तेच तुह्मीं, दौलतखाहीस उचित तें सांगावें ह्मणून खर्ड्यावर तुह्मांस ह्मटलें,