Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२०१] श्री. १ अक्टोबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे–अलीज्याह छ १२ र।।वल शनवारीं बेदराहून निघोन गेले. हें वर्तमान आलें तेच वेळेस सेवेसीं लिहून पाठविलें. नबाबानीं सायंकाळीं बोलाविलें. गेलों. खिलवतींत बसून वतमान सांगितलें. कोणते रुखानें कोणीकडे गेले हें पुसल्यावर ह्मणाले, जनवाड्याकडे गेले इतकेंच वर्तमान आलें, याजउपर पत्रें आलियावर कळेल. ऐसें ह्मणोन सांगितलें कीं तुह्मांस श्रीमंतांकडे पाठवावयाचा बेत पूर्वींच करून श्रीमंतांचे पत्रांत लिहिलें आहे. त्याचा जाब येऊन रवानगी करण्याचा बेत होता. प्रस्तुत असा बेत ठरविला आहे कीं, तुह्मीं मीरअलम यास घेऊन जावें. रघोत्तमरावही तुह्मांबरोबर येतील. यांत दोन तीन कामें. एक तर किस्तीचा ठराव आह्मांकडून निभाव होईल असा करावा. दुसरा प्रकार, भेटीचा ठराव. तिसरा प्रकार, अलीज्याह तिकडे आलियास त्यास धरून द्यावें. त्यास उदईक तुह्मीं पत्रें पाठवावीं. नाकेबंदी करावी. मीरअलम यांस फौजेंत पाठविलें होतें. त्यांची रवानगी तुह्मबरोबर करावयांची. तेव्हां फौजेंत कोणी पाहिजे. याज करितां शिकंदरज्याह याचे रवानगीचा निश्चय केला. तुह्मी तयारी करावी ह्मणोन बोलले. मीं ह्मटलें कीं श्रीमंतांस लिहून पाठवून आज्ञा आली ह्मणजे निरोप घेईन. इतका अवकाश नाहीं. आजच तुमची रवानगी करावी ऐसा बेत ; परंतु शिकंदरज्याह यांचा मुहूर्त दों तिहीं दिवसांत काढविला आहे. इतकाच अवकाश. त्यांजबरोबर तुह्मीं निघावें. मीरअलम यांची गांठ पडलियावर त्यांजबराबरची फौज याज पाशीं राहील. तुह्मीं मीरअलम मिळोन पुढें जावें. तेव्हां ह्मटलें कीं, श्रीमंतांची आज्ञा आली नाहीं, आणि मी निघालों तर शब्द येईल. तेव्हां बोलिले कीं, जाब येण्याची हरकत घातलीत तेव्हां आमची दौलत खाही तुह्मांस मंजूर नाहीं ऐसें वाटतें, दोंही दौलतींची दोस्ती कायम राहून मजबुती असावी ह्मणोन तुह्मांस जा ह्मणतों, श्रीमंत शब्द ठेवणार नाहींत, आह्मीं त्यांस लिहून पाठवितों. ह्मणून मुनशीं बोलावून पत्र लिहावयाचा मतलब सांगितला. मीरअलम यांची रवानगी करावी, मी मागाहून गेलीयास कसें ? तुह्मी ते बरोबर गेलियावेगळ आमची खातरजमा नाहीं. आमची मर्जी तोडून रहावयाचें असलियास रहावें. ऐशी आज्ञा केलियावर लाचार. तेव्हां विनंति केली कीं सरकारांत तालुका देणें तों पुर्ता आला नाहीं वगैरे कामें होणें, हीं करून देऊन रवानगी करावयाची मर्जी किंवा कसें ? राजे रेणूराव यांस सांगितलें कीं तुह्मी व हे बसून निश्चय करून मला सांगावें. पैक्यावेगळ काय असेल तें उलगड्यांत आणावें, पैक्याची बाबत ठरावांत यावयाची ती तेथेंच ठराव करून पाठवितील. आणखीं बोललों कीं मीरअलम येथून दहा बारा कोस असतील, त्यांस बोलावूं पाठवावें, त्यांची माझी एकवाक्यता करून काय बोलावयाचें तें खचित सांगावें. कारण एखादा मुकदमा असा येऊन पडतो कीं इतल्याची फुरसत नाहीं, तेसमयीं मीरअलम वोढूं लागतील, आमचे त्यांचें मिळणार नाहीं, आपण निरोप मीरसाहेबाकडे पाठवून धरमारेंच त्यांची रवानगी केलियास मला काय इरषाद जाला हें त्यांस समजणार नाही, त्यांचें मला कळणार नाहीं, याजकरितां समक्ष बोलावून एकवाक्यता करून घ्यावी ह्मणजे नीट, तेव्हां बोलिले कीं, उत्तम, त्यास बोलावूं पाठवितों. याप्रमाणें जालें. त्यास आज उद्यां इतकियांत मीरअलम येतील. याजकर अधिक ओढून धरल्यास यास संशय;आणि कार्यही कांहीं होत नाहीं ह्मणून मान्य केलें. तालुका लाऊन घेणें वगैरे कामें यातून जें होईल तें करून घेऊन येतों. स्वामीचें नावें या मा।राचें फा लिहविलें. मजपाशीं आलें नाहीं. आलियावर रवानगी करीन. आज परियंत जाला मा।र लिहिला. पुढें होईल तें लिहून पाठवीन. र।। छ १७ र।।वल. हे विज्ञापना.
नबाब निजाम अलीखां बहादुर यांजला श्रीमंतांचा खरितापत्र छ २३ मोहरमीं किस्तीचा ऐवज देण्याविशीं आलें. त्याचा जाब नबाबाकडून श्रीमंतांस खरीतापत्र छ १७ र।।वल डांकेवरून रवाना केलें, त्याची पारशी नक्कल.
येथें पारशी नक्कल.
छ २० र।।वल मु।। भागानगर, रवाना टप्यावर.