Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२७]                                                                               श्री.                                                                            ३० जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. राजश्री रघोत्तमराव छ १०जिल्हेजीं तृतीय प्रहरीं मजकडे आले. त्यांचें जबानीं वर्तमान कळलें कीं, सदाशिव रड्डी शहरापासून पांच कोस दरग्याजवळ उतरला होता. ते दिवशी त्यानें राजे रेणूरावजी यासं तृतीयप्रहरीं चिठ्ठी पाठविली जे, लांब उतरलों, जागा ठीक नाहीं. याजकरितां आनंदगिरीस येऊन राहतों. नवाबास अर्ज करून उत्तर पाठविणार होते. त्याच रात्रीं ह्मणजे छ ९ तेरि खेस मंदवारीं प्रहर रात्र अवशेष असत रड्डी मजकूर आपले जमयतीनिशीं नडव्याचे दरवाजानें कुलुपें तोडून किंवा उघडून दरवाजाच्या आंत येऊन रस्त्यानें शहरांत आले. नाकेबंदी ज्याबज्या केली. आणि आलीज्याहा यांचे दरवाजावर येऊन उभे राहिले. तेवेळेस अलीजाह यांनीं नवाबाकडे चोबदार याजबरोबर सांगून पाठविलें कीं, माझे दरवाजापुढें स्वार येऊन उभे राहिले. आहेत समजत नाहीतं. तेव्हां नवाबांनीं सांगून पाठविलें कीं, तुह्मीं आपले ठिकाणीं सावध मजबूत असावें. इकडून बंदोबस्ताकरितां लोक पाठवितों. नंतर दुसरा चोपदार अलिजाहा यांनीं पाठविला कीं, स्वार आले, त्यांनीं जबरदस्तीनें मला बाहेर काढलें, त्यास हजरतीची माझी भेट झाली पाहिजे. याचा निरोप नवाबांनीं पाठविला कीं, तुह्मीं कसेहीं करून मजपाशीं यावें. त्यानंतर पुन्हा साहेबजादे याजकडील चोपदारानें येऊन सांगितलें जे, त्या स्वारांनी हजरतीचे दरवाजापुंढील जिलौखान्यांत आणिले, दरवाजा खुला करावा ह्मणजे येतों. तेवेळेस नवाबाचा निरोप गेला जे, तुह्मीं एकटे दरवाजाजवळ यावें, ह्मणजे आंत घेऊं. त्यानंतर काय विचार केला न कळे. शेवटचा निरोप आला कीं, मला एकट्यास येऊं देत नाहींत, घेऊन चालले. याप्रमाणें सांगून पाठवून प्रातःकालचे घटिका दोन घटिका रात्रीं जमीयतसुद्धां नडव्याचे दरवाजानें निघून गेले. प्रथम इरादा त्यांचा असा होता कीं, छ १० तेरखेस बकरी इदेचा दिवस, ते दिवशीं नवाब इदग्यास येतील, इदगा अवंतगिरीचे सुमारें आहे, रड्डीनें अनंतगिरीहून येऊन तेथें हजरतीस दगा करावां, इदग्यास नवाब येत नसतात, अशी बातमी कळलियावर दुसरा मनसुबा करून अलिजाहास घेऊन येऊन हवेतीत शिरून दगा करावा असा बेत केला होता. परंतु साध्य न झाला. अवसर थोडा याजकरितां निघोन गेले. समशेरजंग यांचें येथें तेसमयीं जोपदार अलिजाहा यांनीं पाठविला कीं, तुह्मीं येऊन हजर होणें. त्याचा नवाब त्यांनीं दिला कीं, हजरतीचा हुकूम झाल्यावेगळ माझें येणें होणार नाहीं. तेवेळेस रघोत्तरराव यास मीं सांगितलें कीं, माझे येथें एक चोपदार अलिजाहाकडून आला. पाठींमागून कांहीं स्वार, दरवाजावर आले. चोपदारानें निरोप सांगितला कीं, कांहीं बोलवा हजरतीचे हवेलीवर झाला आहे. सर्व येऊन हजर झाले. तुह्मींही लवकर यावें. त्यावेळेस दरवाजाच्या कड्या लागल्या होत्या. आह्मीं चोपदारास सांगून पाठविलें कीं, रात्रीचा विषय, काय आहे हें समजत नाहीं, आमचें येणें होत नाहीं. तेव्हां चोपदार गेला. नंतरचे समजलें नाहीं. माझे येथें चोपदार आलियाचें वर्तमान झालें तें मशारनिल्हेस सांगितलें. चोपदार पाठवून सांगून पाठविणें. दुस-यानें घाबरें होऊन जाणें हें बाटविण्याचें लक्षण. मशारनिल्हे ह्मणाले, अजून काय झालें ? याउपरि सर्वास अलीजाह. पत्रें लिहील कीं, संकेताप्रमाणें तुह्मीं यावें अशी आफत , आणावयास, चुकणार. आपणच जिवावर उठल्यावर दुस-याचे जिवाची परवा त्यास काय ?खावंद समंजस आहेत. इतकी गोष्ट खरी ह्मणून बोलण्यांत आलें. सारांश अलीजाह यांचे सोबती सदाशिव रड्डी, शहरचा सुभा नाजीमजंग, नवाबाचा जांवर्र, आणि सैफजंग गुठूरवाले त्याचे लेक यास किताब तोच आहे असें ऐकिण्यांत चार हजार पायदळ, आणि हजार स्वार, सदाशिव रडीचा, आणि सैफजंगवाले मिळून दोन तीन हजार स्वार, कांहीं पायदळ, याप्रमाणें जमीयत अलीज्याहाबरोबर गेले. पट्टण, चरू, सदाशिव पेंठ, संगारडी पेठ, रडीचाच तालुका तिकडे गेले. अशी बातनी नवाबाचे सरकारांत आली. नवाबाचा निरोप स्वामीस लिहावयाकरितां मशारनिल्हेनीं सांगितला तो अलाहिदा लिहिला त्याजवरून ध्यानांत येईल. र।। छ १२ माहे जिल्हेज. हे विज्ञापना.