Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२००] श्री. १ अक्टोबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे -- अलीज्याहप्रकरणीं नबाबास स्वामीनीं खरीता पाठविला तो दिल्हा. आज्ञेप्रमाणें बोलण्यांत आलें. नबाबानीं पत्र पाहून मागती मला दाखवून वाचूं लागले कीं, श्रीमंतांनीं अलीज्याह यांचे पत्राचा जाब पाठविला. त्यांत लिहिलें आहे कीं, तुह्मांविशी पत्रें पाठविलीं आहेत. त्यांचे जबाब आलियावर तुह्मांस आह्मीं सांगूं तें ऐकावें लागेल, इतका तकवा त्यांस कां दिल्हा येवढ्यावरच ते चढून जातील. दुसरें आह्मांस लिहिलें, सलाहाचे मार्गानें त्यांस समजावावें; न ऐकिल्यास फळ पावतील, ऐसें कां लिहितात. याचें उत्तर केलें कीं, दोस्ती आणि घरोबा ह्मणोन आपणास लिहिलें आहे, मुलापासून चूक झाली तर वडीलपणें आपण कृपा करावी, त्यांनीं चूक झाली याची क्षमा करून घ्यावी, अगर न ऐकिलें तर सजा पोहोंचवावयासी काय उशीर ? तेव्हां बोलिले कीं, रघुनाथराव आह्मांशीं जाबसाल बोलत होते, तो न ऐकतां तुमची पास केली. बलके दौलतीचा अधिकार आमचे शास्त्राप्रमाणें बंधूस आहे. असें असतां आह्मीं त्याची पास केली नाहीं. तसेंच तुह्मीं आह्मांशीं चालावें. मीं उत्तर दिलें कीं, आपले शास्त्रांत कसें असेल तें असो; आमचे शास्त्रांत भावास अधिकार नाहीं. पुत्रासच अधिकार, हें एक. दुसरा प्रकार, रघुनाथराव यांनीं कर्म न करावयाचें तें केलें. तेव्हां त्यांचें मुख अवलोकन करूं नये, ऐसें समजूनच आपणही त्यांचा त्याग केला. याजवर नवाब बोलिले कीं, अलीज्याहनेंही असाच बेत केला होता, घडलें मात्र नाहीं, त्यांजकडून घडलें नाहीं इतकी सुर्खरोई आहे. क्षमापण आपण न केलियास जें फरमावितील तें खरें, श्रीमंतांनीं दूरंदेषीचे मार्गानें लिहिलें, फसाद लांबविणें मुनासब नाहीं, ज्याप्रकारें फंद मोडेल तें करावें, आपणाजवळ त्याची रदबदली करावी अशी कोणाची ताकद. श्रीमंतांस त्यांचीं पत्रें गेलीं, आपणास त्याविशीं लिहिणें हें श्रीमंतांस योग्य, दोंही दौलतींचा घरोब्याचा प्रकार ह्मणोन यांचे तजविजीचा कसा प्रकार करावा हें आपण त्यांस लिहिलें, त्यांनीं आपणास लिहिलें, ह्या चाली याच दौलतींतील. टिपू, इंग्रेज यांस असें आपण लिहिणार नाहींत, तेही बोलणार नाहींत, मसलहतीचे आणि दुरंदेषीचे मार्ग आपण सांगतील तसेंच लिहिण्यांत येईल. नबाबाचें ह्मणणें कीं अलीज्याह यानें उठोन मजपाशीं यावें, तर त्याचें संरक्षण करीन, नाहींतर पारिपत्य. तुह्माकडे आला तर तुह्मीं धरून द्यावें. याप्रमाणें बोलणें. पत्राचा जाब मागतेवेळेस काय सांगतील त्याप्रमाणें मागाहून लिहून पाठवीन. र।। छ १७ र।।वल. हे विज्ञापना.