[२०३]                                                                               श्री.                                                                    ४ आक्टोबर १७९५.

विनंति विज्ञापना--अलीज्याह बहादूर बेदरचे किल्यांतून सदाशिव रड्डी व नाजमन्मुलुक व गालबजंग वगैरे सरदार व जमीयत फौज, पायदळसहित छ १२ र।।वलीं निघाले, ते जनवाड्याचे रस्त्यानें वांजरा किनारियानें गेले. समागमें बेदरांतील पांच तोफा व कांहीं रहेकले, बारुद वगैरे सरंजाम स्वारीसमागमें निघावयाचा तो घेऊन कूच केलें. पयेदळचे लोक व एक जमातदार किल्यांत ठेविला होता. मुसारेमु व घाशीमिया अजमखान वगैरे नबाबाकडील सरदार जमीयतसुद्धां किल्याचे शहावर बाहेर होते. त्यांस समजल्यानंतर मुसारेमूची लयेन किल्याचे बंदोबस्ताकरितां पाठविली. लयेन किल्यांत दाखल होण्यापूर्वीं अलीज्याह यांजकडील जमातदार पयेदळ लोकसुद्धां मागें राहिला होता तो निघोन गेला. मुसारेमूकडील लयेन किल्यांत जाऊन बंदोबस्त किल्याचा जाला. याचें वर्तमान पागावाले व मुसारेमू आदिकरून सरदारांच्या अर्ज्या नबाबास आल्या. किल्ला बाहेरचा फत्ते जाला याच्या खुषीच्या नजरा केल्या. तमाम सरदार मनसबदार मुत्सद्दी यांनीं केल्या. एक दोन दिवस नजरांचेंच प्रकरण होतें. र।। छ २० र।।वल, हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries