Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९४] श्री. १ अक्टोबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. मीरअलम यांचें आमचें संधान पूर्वींपासून आहेच. दोघांची समक्ष भेट होऊन बोलणें व्हावें ही इच्छा, परंतु योग घडेना. असें करितां एक दिवस सरकारी कामास्तव त्यांनीं आह्मीं नवाबाचे येथें एकीकडे बसून बोलावें ऐसें ठरलें. इतकियांत त्यांस ज्वर येऊं लागला. मलाही ज्वरांश जाला. त्यामुळें तो बेत राहिला. नंतर तो योग व्हावा. त्यास अलीज्याह यांजवर पलटणें वगैरे फौजे घेऊन त्यांनीं जावें असें ठरलें. तेव्हां तें चांगले. नबाब सरकारचा फडचा चित्तास येईल तेव्हां करतील. आज यांचे ह्मणण्यानें करतात असें नाहीं. कदाचित् मीरअलम पुढें ह्मणूं लागतील कीं, तेवेळेस मला ह्मटलें असतें तर मी असें करतों. इतकें बोलण्याचें ओझें तरी कशास घ्यावें ? आज गोष्टीचे गोड बोलण्यांत आपले सरकारचा दाब ठेऊन कां न बोलावें? सरकारचें वचन यांसीं गुंतलें, त्याअर्थी यांसही उघडून समजावावें. इतक्यावर यांजकडून कांहींच न जालीयास सरकाराकडे कांहीं नाहीं. पुढें बोलावयासी जागा, ऐसें समजोन रघेात्तमराव यांस सांगितलें कीं, मीरसाहेब यांस आमचा निरोप सांगावा जे, खरड्यावर करारमदार नबाबांनीं श्रीमंतांशीं केला तो तुह्मांस सर्व माहीत, येथें आलियावर नबाबाशीं बोलणें जालें, त्याचीं उत्तरें त्यांनीं दिल्हीं, हल्लीं श्रीमंतांची पत्रें आलीं तीं दिल्हीं, आह्मींही बोलिलों, तथापि कांहींच मार्ग निघत नाहीं, तुह्मीं आह्मीं बसून जुजबियातचा उलगडा व्हावा असें ठरलें, तेंही न जालें, तुह्मीं तर चालला, पुढें फडच्याची षकल काय ? फडच्या व्हावयाचा तसा होईल, परंतु अजराहे दोस्ती, तुह्मांस गोषगुजार करून ठेवतों हें निमित्य उलट येईल, बरें वाईट कांहीं जाल्यास आह्मीं तुमचें नांव घेऊं कीं फलाण्यास आह्मीं सांगितलें होतें, आह्मांकडे शब्द नाहीं, याचा इतल्ला केला असे, याप्रमाणें बोलावें असें सांगितलें. तेव्हां रघोत्तमराव ह्मणाले, असें त्यांस सांगून येथें घेऊन येऊं कीं काय ? मी सांगितलें, बोलावण्याविशीं आमचा पैगाम नाहीं, ते येतील तर घर त्यांचें आहे. तेव्हां राव मा।रनिल्हे दरबारास जाऊन तेथेंच मीरअलम आले होते त्यांशीं बोलले आणि सांगितलें कीं, त्यांजकडे जाऊन बोलणें त्यांचे तुमचें व्हावें हें चांगलें, त्यांतच सलाह आहे, तुह्मांवर त्यांनीं फार उश्रमा केला. मीर याचे मनांत होतेंच. त्यांनीं ह्मटलें, फार उत्तम, मीं सिद्ध आहें, परंतु हजरतीची परवानगी झाली पाहिजे, माझे तर्फेनें तुह्मींच अर्ज करावा ह्मणून सांगितलें. तेव्हां रावमजकूर नबाबाशीं बोलिले जे, मीरसाहेब यांचा अर्ज आहे कीं श्रीमंतांकडील पत्रें फैसल्याकरितां आलीं, त्याजवर रावजीनीं मी बसून मुजका व्हावा तो न जाला, माझे रवानगीचा ठराव जाला, त्यांजकडील जाबसालाचें कांहींच न ठरेंल, आणि असाच मीं गेलों तर त्यांस वाईट वाटेल. त्यांचाही गिल्ला याजविशीं आहे, याजकरितां आज्ञा जालियास त्यांजकडे जाऊन बोलून नंतर रुकसत घेईन. तेव्हां नवाब बोलिले जे, फार चांगलें, यांशीं बोलून आलियावर तुह्मांस रुकसत देऊं, अगत्य जावें. तेव्हां मीर यांनीं सांगून पाठविलें कीं, उदईक मी आपलेकडे येतों. नंतर दुसरे दिवशीं आले. सहा घटिका बोलणें जालें. त्याचा तपशील अलाहिदा लिहिला आहे त्याजवरून ध्यानास येईल.
र।। छ १७ र।।वल. हे विज्ञापना.