Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९२] श्री. २८ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे- छ १२ माहे र।।वल मंदवार ते दिवशीं दीडप्रहर प्रथम रात्रीं अलीजाह यांनीं सर्व लोकांस बोलावून तयारी करून आपले फौज सरंजामसुद्धां निघोन भैकराकडे गेले. दुसरे दिवशीं रविवारीं किल्ला बेदरचा खालींच होता त्यांत मुसारहमू यांणीं ठाणें कायम केलें. पुढें कोणीकडचा रुख धरतील पहावें. सदरहू मजकूर नबाबानीं राजश्री रघोत्तमराव यांजबरोबर सांगून पाठविला. आणखीं सांगून पाठविलें जे, याजकरणीं कांहीं तुह्मांशीं बोलावयाचें आहे, सायंकाळीं बोलावूं ह्मणजे यावें: सायंकाळी गेल्यानंतर बोलणें होईल तें उदईक लिहून पाठवूं. र।। छ १४ माहे र।।वल. हे विज्ञापना.
छ १७ र।।वल, मु।। भागानगर, रवाना टप्यावर.