Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९१] श्री. २८ सप्टेंबर १७९५.
श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसी-
विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना त।। छ १४ माहे रा।।वलपर्यंत मु।। भागानगर येथें स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. अलीजाहबाहाद्दूर आपली फौज सरंजामसुद्धां बेदराहून निघून गेले. बेदरांत ठाणें, नबाबाकडील बसलें; याप्रमाणें आज वर्तमान आलें. त्याजवरून नबाबानीं खुषीच्या तोफा सोडल्या. परंतु अंतर्यामीं नबाव बहुत दिक्क व विचारांत. याप्रमाणें वर्तमान जाहलें तें लिहिलें आहे. अलीजाह कधीं निघाले व कशा त-हेनें आणि कोणीकडे गेले; व बेदरांत ठाणें यांजकडील कशा त-हेंनें बसलें हें सविस्तर समजलें नाहीं. शोध करून मागाहून तपशील वार लिहिण्यांत येईल. हें पत्र लिहीत असतां इतकियांत नबाबाकडून रघोत्तमराव आले. तो मा।र अलाहिदा पुरवणींत लिहिला आहे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.