[१९३]                                                                               श्री.                                                                  १ अक्टोबर १७९५.                           
श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामींचे सेवेसी.
सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना त।। छ १७ माहे र।।वलपर्यंत. मु।।भागानगर येथें स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमान लिहून पेशजी रवानगी केली त्याजवरून, मजकूर ध्यानांत आलाच असेल. मीरअलम माझे येथें आले होते. त्यांशीं भाषण होऊन ते नवाबाकडे गेले. तेथें बोलणें होऊन रुकसत झाले. उपरांत अलीज्याह बेदराहून निघोन गेलियाचें वर्तमान आलें. त्याजविषयीं नबाबानीं बोलावून मजकूर सांगितला. सिकंदरज्याह यांस फौज देऊन पाठलाग करावा असें ठरावून दो चहूं दिवसांत रवानगी करावी ऐसा निश्चय केला. सरकाराशीं करारमदार जाले ते कायम. त्याप्रमाणें अमलांत आणावयाचें. परंतु ज्यांत निभाव होईल ऐसें ठरवावें, ह्मणोन स्वामीकडील खरिता नवाबास आला. त्याचा जाब नबाबानीं दिल्हा. त्यांत गोविंदराव कृष्ण यांस व सरकारचा कोणी एखादा खातरजमेकरितां पाठवावा ऐसा मजकूर आहे. प्रस्तुत नवाबानीं, ठराविलें जे, आतांच तुह्मीं व मीरअलम यांणीं जावें, जाब येण्याची प्रतीक्षा करूं नये. इत्यादिक सर्व तपशील अलाहिदा पुरवण्यांत लिहिला त्याजवरून ध्यानांत येईल. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries