Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९०] श्री. २५ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना. अलीज्याह याशीं तह करावा. नवाब ऐकत नाहींत हें ठीक नाहीं. मी याचें साधन करतों. तुह्मींही श्रीमंताकडून पत्र आलें त्याअन्वयें बोलावें. दोस्तीचे अलमांत चांगले प्रकारें श्रीमंताकडून वरचेवर उपराळ्यास पत्रें यावीं; आणि नबाबास बोध करून सांगून तहरह करावा. हीच सलाहबक्षी बेगबा यांचेंही संमत. नबाब आढकपणा करतात हा स्वभाव आहे. तुह्मीं आह्मीं मिळोन आपल्यावर मर्जी यावयाजोगें करावें ह्मणजे ऐकतील. याप्रों। बोलणें जालें. तपशील मागाहून लिहितो. र।।छ ११ र।।वल. हे विज्ञापना.
छ १४ माहे र।।वल, मु।।.भागानगर, रवाना टप्यावर.