Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२४] श्री. २६ जून १७९५.
विज्ञापना ऐशीजे. येथील चाल ठीक दिसत नाहीं. राजाजी व मीरअल्लम व रघोत्तमराव त्रिवर्ग मिळून नवाबाशीं बोलले. त्यांतील दोन प्रकार ऐकण्यांत आले.
१. एक प्रकार ऐसाजे. गोविंदराव कृष्ण याशीं आज सक्तीने बोलूं नये, आजच सावध होतील. आपले येथील सरदार लोक कित्येक फितुरी आहेत. ते काढून बंदोबस्त केला पाहिजे. नवी जमयत जमा झाली पाहिजे. भोसले, शिंदे, होळकर हे पुण्यांत आहेत. यास रुकसती झाल्या नाहींत. त्यांची रुकसत होऊं न द्यावी तोंपर्यंत यास नाद लावून ठेवावा. ह्मणजे हे वेडेंवाकडें लिहिणार नाहींत. त्यांच्या रुकसती साल्यावर दाब घालून दाबाचे पोटीं कारभार करावा.
१. दुसरी मसलहत. गोविंदराव कृष्ण यास या कामातून काढावें, याचा प्रयत्न करितों, तोंपर्यंत ओढ धरावी. प्रयत्न साध्य असाध्य हें समजेल त्यासारखें करावें. तोंपर्यंत यास दुखवूं नये. गोड बोलून नाद लावावा. पुढें पहावें तसें करावें.
------
२
दोन कलमें. यांतून कोणतें असेल तें असो. त्यास मीं पुढें याशीं कसें बोलावें. सख्त बोलून दाबल्याखेरीज काम व्हावयाचें नाहीं. सरकारचीं पत्रें नवाबास यावीं कीं, कराराप्रमाणें फडचे करावे, यास दिरंग लावून तफावत होणें दोस्तीचे आलमांत दुरुस्त नाही, गोविंदराव कृष्ण यास लिहिलें ते बोलतील, ऐसें पत्र यावें. याची सल्लाह कशी? मी कसें बोलावें ? याविषयीं आज्ञा आली पाहिजे. रघोत्तमराव यांनीं यांस समजावलें आहे कीं, शिंदे मदारुलमहाम यांशीं बहुत खपा आहेत. पैका फौजेचा बहुत चढला आहे. मदारुलमहाम देत नाहींत. याजमुळें खपा. तसेंच होळकर काय बखेडे पाडतात पहावें. त्या नादावरही लागले आहेत. र।। छ ८ जिल्हेज. हे विज्ञापना.
छ १० माहे जिल्हेज
मु।। भागानगर रवाना टप्यावर.