Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२५] श्री. २८ जून १७९५.
श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसीं.
विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापन. ता। छ १० माहे जिल्हेजपर्यंत मु॥ भागानगर येथें स्वामीचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. छ.९ माहे मजकुरीं पिछली रात्र चार सहा घटिका असतां अलीजा बहादूर, नवाबाचे ज्येष्ठ पुत्र यांस सदाशिव रड्डी व हैदराबादचे सुभेदार नाजीमजंग, नवाबाचे जावाई, यांनीं शहरांतून हवेलींतून काढून नेलें. प्रातःकाळींच वर्तमान समजलें. नवाब उठून तेच वेळेस बसले. सरदारांस बोलावणीं पाठविलीं. दुसरे साहेब जादे त्रिवर्ग त्यांस बोलाविलें होतें. दोनप्रहरपर्यंत सर्व लोक होते. शहरचे दरवाजावर पहारे, वाड्यापूढें गाडद नवाबानीं उभी केली, कांहीं हवेलीच्या आंतही घेतली. बंदोबस्त बराच केला, अलीजाह कोणीकडे गेले, याचा पत्ता अद्याप लागला नाहीं. समजल्यानंतर लिहून पाठवीन. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
छ १२ जिल्हेज मु॥ भागानगर.
रवाना टप्यावर.