Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२३]                                                                               श्री.                                                                            २६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. नवाब बोलले कीं, राजाजी व तुह्मीं मिळून दस-यांबादज मुलाकतीचा नक्षा ठरवावा. मीं ह्मटलें, उत्तम आहे, एक अर्ज करितों, हा समजून घ्यावा. श्रीमंतांकडील तहनामा व बेलमंहार मज बरोबर आहे. दिवस पाहून घ्यावा, हजरतीकडील तहनाम्यांत कांही हर्फ नीट करावयाचें तें करून तिकडे पाठवावा, पहिले किस्तीचा वायदा जवळ आला, आतांपासून तजवीज करावी, आणि किस्त लवकर पोहोंचावी, ह्मणजे कराराप्रमाणें अंमल होत चालला, तिकडे खातरजमा पटत जाईल, पुढें मुलाकतीचा बेतही ठरवावा, ही चाल बरी दिसते. तेव्हां मीर अल्लम बोलले कीं, तहनामा दास्ती खुलाशाचा ठरणें ते मुलाकतीचे वेळेस रुबरू ठरेल. तो चांगला कीं नाहीं? आह्मीं ह्मटलें, बाकी ठरण्यांत काय राहिली ? ठरून चुकली, हजरतीनीं तर दिलीच आहे, त्यांत कांहीं हर्फ नीट करावयाचें. तें केलें ह्मणजे झालें, तिकडील तर मजपाशीं तयारच आहे, ठरावांत आलें असतां न होणे हें ठीक नाहीं, याज करितां ह्मणतों. असें बोलल्यावर, बरें आहे, मुकाबला पाहिला. इतकेंच बोलले. सोडचिठ्या लवकर आणवाव्या, ह्मणून दोन चार वेळ सांगितलें. त्यास सोडचिठ्याचे रवानगीविषयीं आज्ञा झालीच असेल. र।। छ ८ जिल्हेज. हे विज्ञापना.