Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ तिसा खमसैन मया व अलफ, सन ११६८ फसली,
अबलसाल छ २८ रमजान, ५ जून १७५८,
वैशाख वद्य ३० शके १६८०
दादासाहेब लाहोराहून देशीं येतांना मारवाडांत जनकोजी शिंद्याची गांठ पडली. त्यास आज्ञा केली कीं, मल्हारराव होळकर याचे भिडेनें नजीबखान याचें पारपत्य झालें नाहीं, आह्मी देशी जातों, तुह्मीं कसेंही करून त्याचें पारपत्य करावें, मारून टाकावें. असें सांगितलेनंतर पुण्याकडे येतांना दत्ताजी शिंदे लग्न उरकून उज्जनीस जात असतां त्यांची गांठ पडली. त्यांसही सदरहूप्रमाणें पारिपत्य करण्याविषयीं आज्ञा झाली. दादासाहेब दुस-याकरितां पुण्यास दाखल झाले. खंडेराव हत्ती वीज-गजाबरोबर लढण्यास आणिला. दादासाहेब देशीं आल्यावर मागाहून मल्हारजी होळकर व जनकोजीचें वांकडें पडल्यामुळें त्यास भेटण्यास आले. भेटी झाल्या. मल्हारजीनें नजीबखान याचे हातें भागीरथीस पूल बांधून सुजायतउद्दवला यावर जावें असें सांगितलें, तें जनकोजीस बरोबर वाटलें नाहीं. पुन: असें सांगितलें कीं, नजीबखान एक हिंदुस्थानांत आहे, त्याचें पारपत्य केल्यास पेशवे जासूदाबरोबर अटकेपर्यंत वसूल आणतील, मग आपण काय करावें ? असें सांगून आपला पालक पुत्र तुकोजी याजबरोबर वीस हजार फौज देऊन, शिंद्यांजवळ जाऊन, मल्हारराव देशीं आले. येतांना उज्जनीस दत्ताजी शिंद्याची गांठ पडली. त्यासही नजीबखान याचे हातें भागीरथीस पूल बांधून सुजातदवला यावर जावें, अशी मसलत दिली. ही त्यास मानवली. विठ्ठल शिवदेव यासही याप्रमाणें सांगितलें. तें दत्ताजीचे मनांत ठसलें. छ ६ तागायत छ ९ सवाल ज्येष्ठ शु.१० शुक्रवार [१३-१६ जून १७५८] पर्वतीस विष्णूची स्थापना झाली. छ १६ तागायत छ २२ रमजान [२४-३० मे १७५८] शकुन्तेश्वराची स्थापना वडगांवावर झाली. धरणीकंप शांत झाला. दादासाहेब यांची स्वारी पुळ्याच्या गणपतीस गेली होती, ती फाल्गुनांत परत आली. रंगाचा समारंभ मोठा केला. सदाशिव पेठेस नवीन वस्ती होत आहे. नारायणराव यांचें नांव नारायण पेठेस ठेविलें. पुण्यास चिरेबंदी कुसूं घालण्याचा कारखाना चालला आहे. छ २७ साबान (६ मे १७५८) सचिवपंत यांजकडे वसूल देत असतां तो सदाशिव रघुनाथ यांजकडे देणें ह्मणून कळलें व जमीनदारास पत्रें छ २० साबान [२९ एप्रिल १७५८] बयाबाई आंबेकरीण मयत झाली, चैत्र वद्य ७ गुरुवार [१९ एप्रिल १७५९]. ताई मृत्यु पावली, कार्तिक वद्य १३ रोज सोमवार [२७ नोव्हेंबर १७५८]. छ २५ रबिलाखर पर्वतीवर दरवाजास तट बांधून १८ लक्ष रुपये देकार झाला. ऐशीं हजार ब्राह्मण जमले होते. छ सवाल (१५ जून १७५८) नाना पुरंदरे व बळवंतराव मेहेंदळे यांजकडून मुतालिकी शिके परत आले. फ्रेंच लोकांनीं फोर्तसेंतदेवीद घेतलें ता. २८ एप्रिल ते पावलिक्पर्यंत घेतलें. ता. १७ फेब्रूवारी सन १७५९ इसवी. याच साली बाबाभाई राजे संस्थान परगणे हवेली नगर हमाईन वसई तालुक्यांत आला, छ २१ रज्जबचे सनदेवरून. मानाजी आंग्रे यास वजारत माआब व सरखेलपणाचीं वस्त्रें दिली होतीं. ते वारले. सबब राघोजी आंग्रे यांस वजारत माआब व सरखेची वस्त्रें दिलीं.