Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

तो येतांच दिल्लीस अंताजी माणकेश्वर गीर्दनवाईवर होता, त्याजवळ फौज थोडी होती. तो पळून गेला. मग दिल्ली शहर लुटलें. बादशहास कैद केलें. दिल्लीत कत्तल करून अठरा हजार मनुष्यें मेली. कराराप्रमाणें चंदाजमानीस अबदालीचा पुत्र तेमूरशहास दिली. गाजुद्दीनखान वजीर यास कैद करून बराबर घेऊन कुरुक्षेत्रावर हल्ला केला. तें क्षेत्र लुटलें. नंतर मथुरेसही अशीच गर्दी करून गोघाटी उतरले. तेथे गाजुद्दीनखान अटकेंत असून, त्याचा डेरा यमुनेच्या कांठी होता. नदीस पाणी फार यामुळें त्या गाजुदीनखान याजवरील पहारेकरी असावध राहिले. गाजुदीनखान यास पोहता येत होतें त्यानें ती संधि पाहून यमुनेंत उडी टाकिली. पोहत पोहत सात कोस आग्रा येथें किल्लेदार याजजवळ येऊन त्यास जीव वांचविण्याविषयीं बहुत आर्जव केल्यावरून त्यास किल्लेदार यानें किल्ल्यांत घेतलें. तो किल्ला अकबर बादशहाचे वेळचा किमयेच्या द्रव्यानें बांधलेला होता. त्याजवर तोफा वगैरे लढाऊ सामान बहुत होतें. गाजुद्दीन पळाला ही खबर कळतांच अबदाली व नजीबखान आग्रा शहरावर निघाले. किल्लेदार याणें आग्रा शहरचे लोकांस ताकीद करून लोक बाहेर काढिले. अबदाली व नजीबखान आग्रा येथें दाखल होतांच किल्लेदारानें चारशें तोफांची सरबत्ती चालविली. किल्ला हातीं येणें कठीण. गाजुद्दीन याजवर प्रसंग पडला याजमुळें पेशवे फौजेसुध्दा व मल्हारजी होळकर इकडे येण्यास निघून नर्मदापार येत आहे अशी खबर ऐकून अबदाली वगैरे फौज तेथून परतून कुंभेरीस सुरजमल्ल जाटावर गेले. पेशवे यांची फौज येत आहे, यामुळें विशेष तसदी न देतां दहा लक्ष रुपये खंडणी घेऊन दिल्लीस आले. नजीबखान याचे विश्वासावर येथें राहणें बरोबर नाहीं, ह्मणून फक्त पांच हजार फौज नजीबखान याजपाशी दिली. ती ठेवून पेस्तर बंदोबस्त पाहूं असें पानावर पान टाकून अबदाली सरदेस येऊन तेथें समदखान मताबखान याजपाशीं दहा हजार फौज व मलका जमानी व चंदा जमानी व तेमुरशा यांजपाशी वीस हजार फौज ठेवून आपण कंदाहारास गेला. मागाहून दादासाहेब मोठमोठया मजला करीत आग्रा येथें जाऊन, गाजुद्दीन यास सोडवून घेऊन दिल्लीस गेले. नजीबखान दिल्ली किल्ल्यांत कोंडला. नंतर तो मल्हारजी होळकर यास शरण आला. होळकर याचे भिडेस्तव त्यास होळकर याचे जिमेस दिला. आलमशा बादशहास पुन्हा दिल्लीतक्तावर बसवून अंताजी माणकेश्वरास गीर्दनवाई सांगितली. नंतर कुरुक्षेत्रास येऊन सरदेस जाऊन समदखान यास लुटून फस्त केला. पुढें लाहोरास गेले. तैमुरशा पळून गेला. फौज लुटली. तेथील सुभा पूर्वी संदीपबेग होता. याचा पुत्र दुराणीनें मारला. स्त्री पुत्र अटकेंत होतीं. तीं सोडून त्यास चाकरीस ठेवून पांच हजार फौज देऊन त्याजकडे सुभा सांगितला. त्याचा कारभारी कायस्थ लक्ष्मीनारायण होता. मल्हारजी होळकर यांणीं नजीबखानाचें अगत्य धरून त्यास आपलेतर्फे अंतर्वेद प्रांत कुरुक्षेत्रापासून कुंजपुरादेखील चाळीस लक्षांची मामलत त्याचे स्वाधीन केली. २१ जुलई सन १७५६ सुराजउद्दवला मुर्शिदाबादेहून येऊन कलकत्ता शहर व किल्ला घेतला. गव्हर्नर व कमांडर चीफ् पळून गेले. १४६ इंग्रज २० फुटांचे कोठडींत कोंडले होते. २० जून रोजीं १२३ मेले. बंगाल, बहार व ओरिसा अल्लीवर्दीखान याजकडे होते. तो मेला. सन १७५६ त त्याचा नातू सुराजउद्दवला गादीवर बसला. १ फेब्रूवारी सन १७५७ सुराजउद्दवला व क्लैव्ह साहेब यांचा तह झाला. क्लाइव्ह साहेबानें कलकत्ता घेतला. २ जानेवारी सन १७५७. फ्रेंचांचे चंद्रनगर घेतलें, ६ फेब्रूवारी सन १७५७.