Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

डावघाव पाहून लढत होते. नवाबांनीं सिंधखेडास जाऊस खासा अंबारी सिंदखेडचे दरवाजाजवळ ठेऊन जाधव यास ठाण्यांतून काढून खासे अंबारींत घेऊन त्याची फौज बाहेर काढून माघारे फिरविले. त्या दिवशीं लढाईचें तोंड लागून दीड प्रहर मातबर लढाई झाली. या लढाईत दत्ताजी शिंदे यास जखम लागली होती. शेवटीं नबाब शिकस्त होऊन पंचवीस लक्षांची जहागीर पेशवे यांस देऊन सल्ला केला. नळदुर्ग किल्ला पेशवे यांनीं घेतला. विश्वासराव यांजवर निजामअल्ली व विठ्ठल सुंदर चालून आले. हें वर्तमान पुण्यांत श्रीमंतांस कळतांच भाऊसाहेबसुध्दां सफर महिन्यांत निघून नाशिकास जाऊन गंगास्नान करून नगरास फराबागेंत राहिले होते. पुढें श्रीमंत विश्वासराव यांजला कर्नाटकांत असतां छ २१ रबिलाखर रोजीं [२ जानेवारी १७५८] अंबेडनजीक भेटी होऊन त्या दिवशीं स्वारी एकत्र झाली. भगवंतराव रामखेडकर व देवजी नागनाथ वकील याचे विद्यमानें नबाब श्रीमंताचे भेटीस आले. नंतर निजाम परत आपले ठिकाणीं गेले. श्रीमंत साकरखेडल्याकडून त्र्यंबकेशराकडे रज्जब महिन्यांत [एप्रिल १७५८] गेले. या लढाईत प्रथम निजामाकडील व्यंकटराव निंबाळकर यांचे मेहुणे नागोजी माने ह्मसवडकर व जनकोजी शिंदे यांचे साडू ठार झाले. दत्ताजी माने यांचे पुत्र व्यंकटराव माने यांची बहीण जनकोजी शिंद्यास दिली होती. लढाई आटोपल्यावर जनकोजी शिंदे उज्जनीस गेले व दत्ताजी शिंदे चांभारगोंद्यास लग्नाकरिता गेले. जनकोजी शिंदे पुढें बुंदिवाड्यांत जाऊन हरगडास लागले. गुमानसिंग गिराशी पळून गेला. त्या युध्दांत बाळोजी शिंदा शिंद्याकडील पडला. खेचीवाडा, राजगड, पाटणा, बुंदिकोट, खंडण्या घेऊन जयनगर माधवसिंग याजपासून वीस लक्ष रुपये खंडणी घेऊन, उदेपूरचे राणोजी याचे राज्यांत शिरले. शिवपुरीचे गढीस लागले. तेथील राजास धरून उदेपूरचे राणोजी यांचें व त्यांचें एकत्र करून, वीस लक्ष रुपये खंड घेतला. लाहोरकडील वर्तान:- अदीनाबेग याजकडे लाहोर व मुलतानचा सुभा होता. त्यास धरावयास अबदालीचे लोक आले. तेव्हां दादासाहेब यांस अदीनाबेगानें निरोप पाठविला कीं, यासमयीं आपण माझें साहाय्य करून मुलूख आपण घ्यावा. त्याजवरून दादासाहेब यांचा तळ तेवेळेस नजीकच दिल्लीस होता, तेथून एकदम चैत्रमासी लाहोरास येऊन, अबदालीचे लोक आले होते त्यांस हांकून देऊन, त्या अदीनाबेगाकडेच लाहोर मुलतानचा सुभा कायम करून, त्याचे रक्षणाकरितां आपली कांहीं फौज तेथें ठेविली. जनकोजी शिंद्यास रजपूत लोकांकडील खंडणी घेण्याचे कामास व लाहोर येथें ठेविलेले फौजेसही कुमक करण्यास सांगितलें. माळव्याचा बंदोबस्त राखण्यास मल्हारजी होळकर व दत्ताजी शिंदे यांस ठेवून आपण पुण्याकडे परत निघाले. ते तिसा खमसैनांत दस-याकरितां परत आले. या सालीं विश्वासराव यांचे बायकोचे गर्भादान झालें. टोळधाड आली. आश्विन व॥ ४ टोक्यास व धोमास भूमिकंप झाला. ३१ आक्टोबर, त्रिचन्नापल्लीस फ्रेंच यांणीं वेढा घातला होता तो इंग्रजांनीं तोडून महमदअल्लीचा पक्ष धरिला. परगणे उदेले हा महाल जवारकर राजाकडील सरकारांत येऊन वसई तालुक्याखालीं वहिवाटीस ठेविला.