Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ सांमान खमसैन मया व अलफ, सन ११६७ फसली,
अवलसाल छ १७ रमजान, ५ में १७५७,
ज्येष्ठ वद्य ३ शके १६७९.

सालगुदस्त श्रीमंत कर्नाटकाहून येतेसमयीं बळवंतराव गणपत मेहेंदळे यांस छावणीस ठेवून कांहीं मुलूख सर करण्यास सांगितलें होतें. त्यांणीं कर्नोल व कडपेकर नवाब याशीं लढाई करून सर केले. याजबद्दल छ ९ सफरीं (२३ अक्टोबर १७५७) पत्र आलें आहे. शिवाय हुसकोट परगणाही कडपेकराकडून घेतला, व तो नबाबही त्या संधींत मयत झाला. पुढें त्याजकडील लोकांनीं मेहेंदळ्याशीं लढाई करून मुलूख त्याचे हातीं लागूं दिला नाहीं. अर्काटचा नबाब याणें चौथाई व सरदेशमुखीबद्दल दोन लक्ष रुपये रोख व अडीच लक्ष रुपये वसुली इतका मुलूख लावून दिला. त्या नबाबानें लबाडी करून पैसा न द्यावा असें कृत्य आरंभिलें; परंतु शेवटास न जातां कराराप्रमाणें देणें भाग पडलें. पेशवे यांची स्वारी सालगुदस्त परत देशीं आल्यावर भागें ह्मैसूरचे दिवाण यांनीं खंडणीत जो मुलूख लावून दिला होता तो परत घेतला. हें वर्तमान पेशवे यांस कळतांच मेहेंदळे यांचे मदतीस गोपाळराव गोविंद पटवर्धन यांस फौज देऊन कर्नाटकांत पाठविलें. त्यांनीं मंगळुरास वेढा घातला. तेव्हां मुख्य कारभारी हैदरअल्लीखान होता. त्यानें पहिल्या कराराप्रमाणें राहिले खंडणीचा पैसा रोख व सोनें देऊन बाकी रुपयांच्या हुंड्या देऊन खंडणीचा निकाल करून आपले महाल परत घेतले. त्यांची वहिवाट करूं लागला. गोपाळराव गोविंद पुढें आणखी मद्रासेकडे गेले होते; परंतु त्यांस मोंगलाईत विश्वासराव याजबरोबर जाण्याकरितां परत बोलाविल्यावरून परत पुण्यास आले व बळवंतराव मेहेंदळेही परत आले. यांजकडील मुतालकी शिक्का छ ८ सवाल (१५ जून १७५८) तिसा खमसेनांत परत आला. छ ११ जिल्हेज रोजीं (२७ आगष्ट १७५७) विश्वासराव यांची स्वारी मोंगलांवर औरंगाबादेस निघाली. बरोबर जनकोजी व दत्ताजी शिंदे, मोरो बाबूराव व महादजी अंबाजी पुरंदरे, दमाजी गायकवाड, समशेरबहाद्दर वगैरे सरदारसुध्दां गेले. तेव्हां सलाबतजंग व बसालतजंग व निजाम अल्लीखान अवरंगाबादेस होते. त्यांशीं दोन तीन महिने लढाई चालत होती. रामचंद्र जाधवराव दोन हजार फौजेनिशीं नबाब याजकडे भालकीहून येत होते. हें कळतांच विश्वासराव यांनीं दत्ताजी शिंदे यास त्याजवर पाठविलें. तेव्हां सरकारचें ठाणें सिंधखेडास होतें. शिरले. दत्ताजी शिंदे यानीं ठाण्यास मोर्चे देऊन बसविले. तेव्हां निजामअल्ली फौजसुध्दां जाधव यास घेऊन येण्याकरितां चालले. त्याजवर खुद्द विश्वासराव चालले.