Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
श्रीमंतांनी पुष्कळ रीतीनें सांगितलें. तत्राप आपणच जाण्याचा आग्रह धरिला. सबब चिरंजीव विश्वासराव यांस त्यांजबरोबर घेण्याचा विचार ठरवून छ २५ रज्जब रोजीं (१४ मार्च १७६०) फाल्गुन वा १२ शुक्रवारीं सर्व तयारी करून चैत्र शु॥ १ चे (१८ मार्च १७६०) मुहूर्तानें पानपतचे स्वारीस चालते झाले. श्रीमंत पुण्यास परत आले. यासालीं दुस-या किरकोळ गोष्टी घडल्या त्या. छ ११ रमजान (२८ एप्रिल १७६०) मुलेरचा किल्ला घेतला. इंग्रजांशीं सलाबतजंग यानें तह करून मच्छली बंदर इंग्रजांस दिलें. छ ६ जिल्हेज (३१ जुलै १७५९) नाना पुरंदरे यांचे घरीं मु॥ शिक्का होता तो त्र्यंबकराव मामा पेठे सातार यांस पाठविलें, त्याचे हवालीं केला. नारायणराव व्यंकटेश कर्नाटकांत पाठविला. यास मुतालकी शिक्का दिला छ १२ रमजान (२९ एप्रिल १७६०) पुण्याचें गांवकुसूं चिरेबंदी करण्याचें काम जिवाजीपंत अण्णा खासगीवाले यांचोमार्फत चाललें होतें. सुरत अठ्ठावीस पैकी सात महाल दमाजीपासून घेतले. दोन घटका रात्रीस तारा पडून मोंठा आवाज नगा-यासारखा या साली एके दिवशीं झाला होता. भाऊसाहेब स्वारीस निघाले. त्याजबरोबर वीस हजार स्वार, पायदळ व गारदी इब्राहिमखान तोफखानासुध्दां, दहा हजार लोक, व याखेरीज पेशवे यांनीं आज्ञा केल्यावरून मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदा व दमाजी गायकवाड, यशवंतराव पवार व अप्पाजीराव आठवले व अंताजी माणकेश्वर व गोविंदपंत बुंदेले वगैरे सरदार फौजेनिशी त्यास मिळाले, व याशिवाय रजपूत लोक आपापल्या टोळ्यांनिशी. सदाशिवराव याजबरोबरही बळवंतराव गणपत मेहेंदळे, व समशेर बहादर नारो शंकर व विठ्ठल शिवदेव विंचूरकर व त्र्यंबकराव सदाशिव पुरंदरे याशिवाय मराठे सरदार आले होते, व होळकर याचे स्नेहाकरितां सुरजमल जाटही तीस हजार फौजेसहित आला. या लष्करासहित येऊन प्रथम दिल्ली घेतली. पुढें जावें तों पर्जन्यकाळ आला, ह्मणून डेरे देऊन राहिले. भाऊसाहेब यांचें लष्कर दोन लक्ष, व दोन कोट रुपये जवळ होते, ते खर्चास पुरणार नाहींत, ह्मणून दिल्ली बादशहाचा दिवाणखाना सोन्यारूप्यानें मढविलेला होता, तो होळकर व जाट सुरजमल सांगत असतां, न ऐकून मोडून सतरा लक्ष रुपये उत्पन्न केले. तो अन्याय पाहून सुरजमल व रजपुतांचें लष्कर निघून माघारें गेलें. इतक्यांत अबदाली यानें गंगेचे कांठीं डेरे देऊन सुजायतदौला आपल्याकडे करून घेतला. या सालीं भाद्रपदमासीं मोठा पाऊस पडला. पक्षाचे दक्षिणेस ब्राह्मण पर्वतीस गेले होते. ओढ्यास पाणी येऊन दोन चारशें ब्राह्मण वाहून गेले. (१९ सप्टंबर १७६०).