Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

दिल्ली पुन: परत घेतल्याचे कामास श्रीमंताकडे त्या वजीरानें साहाय्य मागितल्यावरून पुण्याहून सफर (नोव्हेंबर १७५६) महिन्यांत दादासाहेब या लाहोरच्या स्वारीस निघाले. त्यांजबरोबर विठ्ठल शिवदेव वगैरे फौजेचे सरदार होते. तेव्हां विठ्ठल शिवदेव यांस ती कामगिरी दादासाहेब याणीं सांगितल्यावरून त्यांणीं दिल्ली शहर इराणी बादशहाकडील नजीबउद्दवल्याचे ताब्यांत होतें तें घेऊन त्याजवर हल्ला चढविला. तो पळून रोहिले खंडात गेला. दिल्ली शहर बादशहाचे ताब्यांत आल्यावर बादशहा खूष होऊन विठ्ठल शिवदेव यास पोषाख व जवाहीर व मोर्चे वगैरे देऊन राजे उमदे उलमुलूख बहादर असा किताब देऊन शिवाय चांदवड तालुक्यापैकी विंचूरसुध्दां पांच गाव व मनमाड परगणे पाटोदे व दहिवड परगणे वडदरी व चादार परगणे नाशिक व करंजी परगणे कुंभेरी अशी नऊ गावें इनाम दिली. यावेळेस दादासाहेबांचा तळ दिल्लीवरच सरदारासुध्दां राहिला होता. शिवनेर किल्ला पुण्यानजीक जुन्नराजवळचा महंद अलमखान किल्लेदार मोंगलाकडील याचे ताब्यांत होता. तो हा एकच किल्ला मोंगलाकडे राहिला. तो आपल्याकडे असावा अशी बाजीराव बल्लाळ याचे वेळेपासून तजवीज चालली होती; परंतु लढून हस्तगत होण्यासारखा नाही. मोठा मजबूत होता. सबब किल्लेदार याशी उध्दव वीरेश्वर चितळे याचे विद्यमानें बोलणें लावून त्यास जागीर वंशपरंपरेने देण्याचें ठरवून किल्ला सरंजामाचे महालसुध्दां घेतला. जहागीर चाळीस हजारांची बाल्हें वगैरे गांव व नगर जिल्ह्यापैकी कांही गांव असे त्यावेळेस दिले होते; परंतु त्यापैकी बहुतेक गांव पेशवे यानी परत घेतले. एक कसबा बाल्हें हा गांव त्याचे वंशिकांकडे चालत आहे. या सालापासून शिवनेर तालुका असा निराळाच केला. साल गु॥ शीत खमसैन साली नबाब सावनूरकर याजवर स्वारी झाली. तें कार्य करून या सालांत अवल साली छ २० सवाल रोजी (२० जुलै १७५६) पुण्यांत आल्यावर, विजयदुर्ग किल्ला इंग्रजांनी घेतला होता, तो इंग्रजांकडून सरकारांत घेऊन, बाणकोट व त्याखालील गांव हे इंग्रजांस दिले. याची हकीकत मागील सालांत तपशीलवार लिहिली आहे. सदाशिव रामचंद्र यांस खंबायतकर मोंगल याजवर पाठवून त्यानी अमदाबाद घेतली होती ती परत घेतली. वजीर मीर शाबुद्दीन उर्फ गाजुद्दीन याचे पदरी नजीफखान प्याद्याची जमादारी करीत असे व पुढें शिलेदार होऊन मोठा प्रसिध्द होऊन त्यास अंतर्वेद सुभा सांगितला होता. बादशहाची स्त्री मलका जमानी व कन्या चंदाजमानी सिलीमगडावर अटकेंत होत्या. त्यांस अन्नवस्त्र बरोबर न मिळे. त्यांनी कंटाळून असा विचार केला की, आपले भ्रताराकडे समुद्रवलयांकित पृथ्वीचें आधिपत्य होतें, असें असून आपण असें कारागृहांत राहणें ठीक नाहीं, याचा बंदोबस्त करणार पराक्रमी एक नजीबखान रोहिला आहे, त्यास आणण्याविषयी गुप्त रीतीनें खोजास पाठवून, त्यास आणवून, त्याचे विचारें असें ठरलें की आपली मुलगी चंदाजनानी ही कंदाहारचा बादशहाचा पुत्र तेमुरशा हा यास देऊन त्यास येथील बादशाहा करावा व अयोध्येचा नबाब मनसूरअल्ली ऊर्फ सफदरजंग पूर्वी महंमद बादशहाचे वेळेस वजीरी करीत होता त्याचा पुत्र सुजायतदौला यास वजीरी द्यावी, असा शपथपुरस्कर विचार ठरवून नजीबखान यानें आपला भाऊ सुलतानखान यास अबदालीकडे पाठवून त्यास आणविले.