Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
दहा लक्ष रुपये सांपडले. पेशवे यांशी वांटणी न देता सर्व आपणच घेतले; आणि विजयदुर्ग किल्ला आपणाकडे असावा व बाणकोट पेशवे यांस द्यावें अशी तजवीज योजिली. पेशवे कर्नाटकांतून आल्यावर १२ अक्टोबर १७५६ रोजी इंग्रेजांशी असा तह ठरला की, बाणकोट व त्याखालील मुलूख इंग्रेजांनी घ्यावा व विजयदुर्ग पेशवे यांजकडे असावा. मराठे सरदारांनी किल्ले घेतले त्याची वर्तमाने :- छ ५ मोहरम (१२ अक्टोबर १७५५) भवाळगड फत्ते जाल्याचें वर्तमान आलें. छ २५ रबिलावल (२९ डिसेंबर १७५५) खारेपाटणची गढी फत्ते जाल्याचे वर्तमान आलें. छ १७ रबिलावल (२१ डिसेंबर १७५५) अनवाळें घेतल्याची बातमी आली. छ ८ रबिलाखर (११ जानेवारी १७५६) राजापूर घेतल्याचे वर्तमान आलें. छ २१ रबिलाखर (२४ जानेवारी १७५६) गोवळकोट लढाई होऊन फत्ते जाला. छ ४ जमादिलावल (५ फेब्रुवारी १७५६) गोवळकोट वगैरे महाल सरकारांत घेतल्याचे पत्र रामाजी महादेव यांजकडून आले. छ ११ जमादिलाखर (१३ मार्च १७५६) रसाळगड फत्ते झाल्याची बातमी आली. छ ३ जमादिलाखर (५ मार्च १७५६) विजयदुर्ग फत्ते जाल्याचें वर्तमान आले. कांही दिवस इंग्रजांकडे राहिला. छ ११ व छ २१ जमादिलावल (१४ व २४ जानेवारी १७५६) रामगड घेतल्याची पत्रें आलीं. तुळाजी आंग्रे यास धरून विसापूर किल्ल्यावर कैदेंत ठेविलें. छ १ जिल्काद (१० आगस्ट १७५५) नारायणराव जन्मले. कन्या रास, श्रावण शुध्द ३ रविवार, जानकीबाई दादासाहेब यांची बायको बाळंत होऊन वारली. छ १३ जिल्काद श्रावण वद्य १, पुत्र जाला होता. गोपाळराव बर्वे यांची बहीण. छ ४ सफर (९ नोव्हेंबर १७५५) चाकण किल्ला फत्ते झाल्याचे वर्तमान आलें. छ १३ रबिलावल (१७ डिसेंबर १७५५) गलगलें येथें दादासाहेबांचे दुसरे लग्न जालें. मार्गशीर्ष शुध्द १४. राघो महादेव ओक यांची कन्या नांव आनंदीबाई. छ ४ रबिलावल (८ डिसेंबर १७५५) सगुणाबाई यात्रेस गेली. पर्वतीचे तळ्यास काम लाविले. छ २३ सफर मुतालिकीची शिकेकटार परत आली. मुर्शिदाबादचा नवाब अल्लीवर्दीखान मेला. त्याचा नातू-मुलीचा मुलगा-मिर्झाहमद सिराजउद्दवला गादीवर बसला. बुंदीचा राजा मेला. त्याचा मुलगा लहान, सबब पितृव्य पुत्र गादीवर बसूं देईना, राजाच्या बायकोनें शिंद्यांची मदत मागितली. त्यांनी प्रतिस्पर्ध्यास कैद करून, मुलास गादीवर बसविलें. पाऊण कोट रुपये खंडणी घेऊन शिंदे माघारे निघाले. श्रीगोंद्यास श्रीमंत भेटीस आले. अर्धे मारवाड काबीज केलें तें त्यांजकडे दिलें. त्यांस कोणाची वांटणी नाही. जनकोजीस सरदारी शिकेकटार दिली. महादाजी अंबाजी व त्र्यंबकराव सदाशिव पुरंधरे यांचे सरंजाम वांटणीविषयी छ ११ साबान (११ एप्रिल १७५६) रोजी सनदापत्रें झालीं.